Pune Pimpri Crime | मॅट्रिमोनियल साईटवरची ओळख पडली महागात, लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेवर अत्याचार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | सध्या लग्न जमवण्यासाठी कित्येक तरुण तरुणी मॅट्रिमोनियल साईटची (Matrimonial Site) मदत घेतात. याचाच फायदा घेऊन भामटे पीडित महिलांना आपल्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) करतात. अशाच प्रकारची एक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. घटस्फोटीत (Divorce) महिलेला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढेच नाही तर पीडित महिला गरोदर राहिल्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात (Abortion) केला. याप्रकरणी एका तरुणावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Pune Pimpri Crime) करण्यात आला आहे.

 

याबाबत 24 वर्षीय पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून शैलेश दिपक पवळे Shailesh Deepak Pavle (वय – 24 रा. पोलीस लाईन बिल्डिंग, वाकड) याच्याविरुद्ध IPC 376, 376 (2) (एन), 313, 323, 504 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. ही घटना काळेवाडी, ताथवडे, वाकड, जुनी सांगवी येथे नोव्हेंबर 2021 ते 8 ऑगस्ट 2022 या कालावधीत घडली. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही घटस्फोटीत असून तिची आणि आरोपीची ओळख मॅट्रिमोनियल वेबसाईटवर झाली. आरोपीने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून काळेवाडी, ताथवडे, वाकड आणि जुनी सांगवी परिसरातील हॉटेलमध्ये नेले. त्याठिकाणी तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. फिर्यादी या गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने पोटदुखीची गोळी म्हणून गर्भपाताची गोळी खाण्यास देऊन जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एस. मासाळ (PSI R.S. Masal) करीत आहेत.

 

 

Web Title : – Pune Pimpri Crime | Matrimonial site identified as Mahagat rape of divorced woman by luring marriage

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा