Pune Pimpri Crime News | ऑनलाइन नोकरीचे आमिष दाखवून महिलेची 13 लाखांची फसवणूक, चिंचवडमधील प्रकार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | ऑनलाईन नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेकडून 13 लाख 27 हजार रुपये घेऊन आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 21 मार्च ते 27 एप्रिल या कालावधीत चिंचवड येथे ऑनलाईन घडला आहे. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime News)

महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अॅलेक्स जीओवानी मोबाईल क्र. 7423009XXXXX, हेमा मोबाईल क्र. 60093XXXXX यांच्यासह विविध बँक खाते धारकांवर आयपीसी 419, 420 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेची प्राथमिक माहिती गोळा करुन त्यांना संपर्क साधला. त्यानंतर त्यांना ऑनलाईन नोकरी (Online Job) देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करुन सुरुवातीला एक पार्सल कस्टममध्ये अडकल्याचे सांगितले. नोकरी आणि कस्टममधील पार्सल सोडवण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून महिलेला वेगवेगळ्या बँक खात्यावर 13 लाख 27 हजार रुपये जमा करण्यास सांगितले. महिलेला फोन करणाऱ्या व्यक्तीने तो कार्निव्हल ब्रिझ शिपींग कंपनीचा (Carnival Breeze Shipping Company) प्रतिनिधी असल्याचे भासवले होते. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे (Sr PI Dilip Shinde) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

ऑनलाइन टास्क देऊन तरुणाला 18 लाखांचा गंडा, पिंपळे गुरव मधील प्रकार

पूर्ववैमनस्यातून तरुणावर चाकूने वार, घोरपडी गावातील प्रकार

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ का टाकला?, तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण; उरुळी देवाची येथील घटना

एकाच फ्लॅटची दोन जणांना विक्री, बिल्डरसह तिघांवर गुन्हा दाखल; देहुगाव येथील प्रकार

ग्राहकांनी ऑनलाईन मागवलेले 23 मोबाईल कुरिअर कंपनीच्या कर्मचाऱ्याने पळवले, पिंपरी चिंचवडमधील प्रकार