पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | आई आणि मुलीसोबत गैरवर्तन करत विनयभंग (Molestation) करणाऱ्या आरोपीला वाकड पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. हा प्रकार (Pune Pimpri Crime News) शनिवारी (दि.28) रात्री साडेसातच्या सुमारास गोफणे वस्ती, ताथवडे येथे घडला आहे. याप्रकरणी आरोपीसह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पीडित तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) शनिवारी (दि.28) फिर्याद दिली आहे. याप्रकरणी नंदकुमार किसन काळे Nandkumar Kisan Kale (रा. गोफणे वस्ती, ताथवडे) व त्याच्या पत्नी विरुद्ध आयपीसी 354, 452, 34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकाच परिसरात राहता.
आरोपीने फिर्यादी यांच्या 37 वर्षीय आईचा हात पकडून सोन्याची रिंग दाखवून सोबत फिरायला येण्यासाठी जबरदस्ती केली.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर, फिर्यादी घरात एकट्या असताना जबरदस्तीने घरात घुसून गैरवर्तन केले.
याबाबत फिर्यादी व आई याचा जाब विचारण्यासाठी आरोपीच्या घरी गेल्या असता आरोपीच्या पत्नीने दोघींना मारहाण करत शिवीगाळ केली.
तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपींना अटक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मणेर (PSI Maner) करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime News | Rapist arrested for abusing mother and daughter, incident in Wakad area
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Supriya Sule | ‘वंचित’ सोबतच्या युतीबाबत स्पष्टचं बोलल्या सुप्रिया सुळे; म्हणाल्या…