Pune Pimpri Crime News | अश्लील व्हिडिओ पाठवून महिलेचा विनयभंग, एकाला अटक; चिखली परिसरातील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | महिलेचा पाठलाग करुन तिच्या मोबाईल क्रमांकाच्या व्हॉट्सअॅपवर अश्लील व्हिडिओ पाठवून विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना पिंपरी चिंचवड मधील चिखली परिसरात घडली आहे. याप्रकरणी 30 वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही घटना सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून 20 नोव्हेंबर या कालावधीत निघोजे, चिखली, देहू-आळंदी रोड येथे घडली. (Pune Pimpri Crime News)

याबाबत पीडित महिलेने चिखली पोलीस ठाण्यात (Chikhli Police Station) सोमवारी (दि.20) फिर्याद दिली आहे. त्यानुसार मयुर संजय शिंदे Mayur Sanjay Shinde (वय-30 रा. कोलोंसेस ग्रिनसिटी, देहु-आळंदी रोड, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354(अ) (ड) नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मयूर याने फिर्यादी महिलेचा सतत व्हॅगनर कारमधून पाठलाग केला. तसेच महिलेला व्हॉट्सॲपवरून अश्लील व्हिडीओ व मेसेज पाठवले. आरोपीने अश्लील व्हिडीओ कॉल करून वेळोवेळी विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पुण्यातील कणसे अँड कंपनीची साडेबारा लाखांची फसवणूक, तिघांवर FIR

हॉटेल कर्मचाऱ्यांकडून मालकाला लाखोंचा गंडा, मगरपट्टा परिसरातील प्रकार

धक्कादायक! गर्लफ्रेंडशी भांडण झाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलनं संपवलं स्वत:चं आयुष्य