Pune Pimpri Crime | तळेगाव दाभाडे येथे भरदिवसा दरोडा टाकणाऱ्या टोळीला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेकडून अटक, 25 लाखाचा ऐवज जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | तळेगाव दाभाडे येथे भरदिवसा दरोडा टाकून (Talegaon Dabhade Robbery Case) लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. या गुन्ह्यातील पाच जणांच्या टोळीला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Chinchwad Police) गुन्हे शाखेच्या युनिट -3 (Crime Branch Unit-3) ने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून दोरोड्यातील आणि 12 चैन स्नॅचींगच्या गुन्ह्यातील 25 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हॉटेल व्यवसाय करण्यासाठी आरोपींनी दरोडा (Pune Pimpri Crime) टाकला असून आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले आहे.

 

अमर हरिदास दहातोंडे (वय-20 रा. वडाळा ता. नेवासा, सध्या रा. खेड जि. पुणे), अनिल गोरखनाथ मस्के (वय-30 रा. चिंबळी फाटा, मुळ रा. समता नगर, ता. पनवेल जि. रायगड), राजु रविशंकर यादव (वय-24 रा. तळेगाव दाभाडे, मुळ रा. उत्तरप्रदेश), सोपान अर्जुन ढवळे (वय-24 रा. तळेगाव दाभाडे, मुळ रा. शहारा जि. बुलढाणा), प्रशांत राजु काकडे (वय-30 रा. गणपती चौक, तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) आयपीसी 395, 452, 323, 506(2), महाराष्ट्र पोलीस कायदा (Maharashtra Police Act), आर्म अॅक्ट (Arm Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. ही घटना 10 जानेवारी रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास घडली होती. आरोपींनी 24 तोळे सोने व रोख रक्कम चोरुन नेली होती. (Pune Pimpri Crime)

 

या गुन्ह्यचा तपास गुन्हे शाखा युनिट तीन कडे वर्ग करण्यात आला होता. आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार विठ्ठल सानप व पोलीस शिपाई रामदास मेरगळ यांना आरोपींची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपी पैकी राजु यादव याच्यावर अलिबाग पोलीस ठाण्यात (Alibaug Police Station) गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो 8 वर्षे जेलमध्ये होता. तसेच तो मोक्का गुन्ह्यातुन जामीनावर 2020 मध्ये सुटला आहे. तर अनिल म्हस्के याच्यावर पनवेल पोलीस ठाण्यात (Panvel Police Station) खुनाचा गुन्हा दाखल असून तो जामीनावर असल्याची माहिती तपासात समोर आली.

हॉटेल व्यवसायासाठी टाकला दरोडा
आरोपी राजु यादव व सोपान ढवळे यांना हॉटेल व्यवसाय करायचा असल्याने त्यांनी पैशांची जमवाजमव सरु केली होती. तळेगाव परिसरात फिरत असताना समजले की, फिर्यादी हे पूर्वी गुटख्याचे व्यापारी होते तसेच ते जेलमध्ये होते. त्यांनी त्यांच्या घरात काळा पैसा मोठ्या प्रमाणात दडवून ठेवला असल्याची माहिती आरोपींना समजली. त्यानंतर यादव आणि ढवळे यांनी इतर साथीदाराच्या मदतीने हत्यारांची जमवाजमव करुन दरोडा टाकला.

 

2 पिस्टल 22 काडतुसे जप्त
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून एक दरोड्याचा, 12 चैन स्नॅचिंगचे गुन्हे,
लोणीकंद पोलीस ठाण्यातील (Lonikand Police Station) वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.
त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, 2 पिस्तुल, 22 जिवंत काडतुसे, दहा हजार रुपये रोख,
430 ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण 25 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे (CP Vinay Kumar Chaubey),
सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया (Joint CP Manoj Lohia),
अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे (Addl CP Sanjay Shinde),
पोलीस उपायुक्त गुन्हे स्वप्ना गोरे (DCP Swapna Gore), सहायक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. प्रशांत अमृतकर (ACP Dr. Prashant Amritkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड (Senior Police Inspector Shailesh Gaikwad),
पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले (PSI Girish Chamle), पोलीस अंमलदार यदु आढारी, सचिन मोरे,
ऋषीकेश भोसुरे, सागर जैनक, राजकुमार हनमंते, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, राहुल सुर्यवंशी,
सुधीर दांगट, महेश भालचिम, विठ्ठल सानप, समीर काळे, निखील फापाळे, शशिकांत नांगरे,
रामदास मेरगळ यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Pimpri Chinchwad Crime Branch arrests a gang that committed a broad daylight robbery in Talegaon Dabhade, 25 lakhs has been seized

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Prisoners Release | प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील 189 कैद्यांना विशेष माफी, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय

Michael Bracewell | ब्रेसवेलने केली धोनीच्या ‘त्या’ विक्रमाशी बरोबरी; अशी कामगिरी करणारा ठरला जगातील दुसरा खेळाडू

Maharashtra Politics | बहुमत राष्ट्रवादीला; सूत्रे मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हाती…