Pune Pimpri Crime | भोसरीतील व्यावसायिक महिलेच्या खुनाचा 10 दिवसांनी पर्दाफाश; कारण आलं समोर

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | भोसरी येथे पूजा ब्रिजकिशोर प्रसाद Pooja Brijkishore Prasad (वय-31) या महिलेचा गळ्यावर वार करुन खून (Murder) केल्याची घटना 16 ऑगस्ट रोजी सकाळी घडली होती. पुजा या त्यांच्या दुकानात काम करत असताना अज्ञात आरोपीने त्यांच्या गळ्यावर वार करुन करुन पळून गेला होता. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा (FIR) दाखल करुन आरोपीचा शोध सुरु केला होता. गुन्हे शाखेच्या (Crime Branch) गुंडा विरोधी पथकाने गुन्ह्याचा तपास करुन 10 दिवसांनी मुख्य आरोपीला बेड्या (Pune Pimpri Crime) ठोकल्या आहेत.

 

रामकिशन शंकर शिंदे Ramkishan Shankar Shinde (वय-24 रा. कारेगाव, ता. हवेली, मुळ रा. बाभुळगाव, ता. शेलगाव, जि. हिंगोली) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. खुनाच्या घटनेनंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेच्या सर्व युनिटच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या होत्या. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी गुंडा विरोधी पथकाने भोसरी आणि चाकण परिसरातील 250 पेक्षा जास्त ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच आरोपीचा फोटो प्राप्त करुन समाज माध्यमावर व्हायरल करुन आरोपीची माहिती देण्याचे आवाहन केले होते. (Pune Pimpri Crime)

 

दरम्यान आरोपीने रांजणगाव पोलीस ठाण्याच्या (Ranjangaon Police Station) हद्दीमध्ये एका ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेचा मोबाईल व रोख रक्कम चोरल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने रांजणगाव पोलिसांकडे चौकशी केली असता दोन्ही गुन्ह्यातील आरोपी एकच असल्याची खात्री पटली. त्यानुसार पोलिसांनी कारेगाव परिसरात आरोपीचा शोध घेत असताना आरोपीला कारेगाव येथील खंडोबा मंदिराच्या पाठिमागून ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पैशांची आवश्यकता असल्याने त्याने जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने महिलेचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Pimpri Chinchwad CP Ankush Shinde),
अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे (Addl CP Sanjay Shinde),
पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे (DCP Dr. Kakasaheb Dole ),
सहायक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर (ACP Dr. Prashant Amritkar),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे पद्माकर घनवट (ACP Padmakar Ghanvat)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एच.व्ही. माने (API H.V. Mane), पोलीस अंमलदार प्रविण तापकिर,
सोपान ठोकळ, विक्रम जगदाळे, गंगाराम चव्हाण, गणेश मदने, विजय गंभिरे, सुनिल चौधरी, मयुर दळवी,
नितीन गेंगजे, शाम बाबा, विजय तेलेवार, रामदास मोहीते, ज्ञानेश्वर गिरी, शुभम कदम, तौसीफ शेख यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Pimpri Chinchwad Police Crime Branch
exposed Business woman’s murder in Bhosari after 10 days

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा