Pune Pimpri Crime | पुण्यातील धक्कादायक प्रकार ! बालविवाहप्रकरणी पतीवर FIR; अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघडकीस

0
231
Pune Pimpri Crime | Shocking types in Pune! FIR against husband in case of child marriage; An underage girl gets pregnant
file photo

चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | कायद्याने बालविवाह लावणे आणि करून देणे हा गुन्हा असतानादेखील अनेक ठिकाणी बालविवाह लावले जात आहेत. असाच एक प्रकार पुणे जिल्ह्यातील चाकण येथे उघडकीस आला आहे. 12 वर्षांची अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या पतीवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) मे 2022 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत खेड तालुक्यात घडला आहे.

 

याबाबत करंजविहिरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी पीडित मुलीचा पती राहुल शिवाजी भले (रा. वराळे नाणोली, ता. वडगाव मावळ) याच्याविरुद्ध आयपीसी 376 (2), (i), 366 (अ), बालविवाह कायदा, पॉक्सो अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या गुन्ह्यातील आरोपीचा 16 नोव्हेंबर रोजी अपघातात मृत्यू झाला आहे. (Pune Pimpri Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या करंजविहिरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करतात. बुधवारी 12 वर्षांची मुलगी फिर्यादी यांच्याकडे पोटात दुखत असल्याने उपचारासाठी आली होती. फिर्यादी यांनी तिला तपासले असता ती गरोदर असल्याचे समजले. फिर्यादी यांनी चाकण पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलिसांनी मुलीकडे चौकशी केली असता, तिने सांगितले की तिचे पती चालक म्हणून काम करत होते. 16 नोव्हेंबर रोजी भंडारा डोंगर येथे झालेल्या रोड अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे.

आरोपी आणि पीडित मुलगी यांची ओळख गावच्या जत्रेत झाली होती. आरोपीने लग्नाची मागणी करून लग्नास नकार दिला,
तर औषध पिऊन आत्महत्या करण्याची धमकी मुलीला दिली.
पीडित मुलीने लग्नाला होकार दिल्यानंतर आरोपीने तिच्यासोबत लग्न केले.
त्यानंतर पतीने अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक संबंध प्रस्थापित करुन तिला गरोदर केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डेरे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Shocking types in Pune! FIR against husband in case of child marriage; An underage girl gets pregnant

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, धायरीतील घटना

MNS Chief Raj Thackeray | सिंधुदुर्गमध्ये एन्ट्री करताच राज ठाकरेंचा विरोधकांना सूचक इशारा, म्हणाले…

Police Recruitment | तृतीयपंथींचे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण होणार, ‘मॅट’ने दिले महत्त्वाचे आदेश