Pune Pimpri Crime | दिवाळीसाठी कपडे खरेदी करताय! पिंपरी चिंचवडमध्ये होतेय नामांकित कंपनीच्या बनावट कपड्यांची विक्री, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | दिवाळी (Diwali) सणाच्या तोंडावर पिंपरी चिंचवडमध्ये मोठी करवाई करण्यात आली आहे. कपड्यांच्या नामांकित कंपनीच्या (Reputed Company) नावाचा आणि लोगोचा वापर करुन बनावट कपड्यांची विक्री करणाऱ्या दोघांवर वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) कॉपीराईट अॅक्टनुसार (Copyright Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या कारवाई 15 लाख 75 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल (Pune Pimpri Crime) जप्त केला आहे.
इम्रान युनुस शेख Imran Yunus Shaikh (रा. ओंकार कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) आणि लुधियाना पंजाब (Ludhiana Punjab) येथील शिव भोले यांच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी नरेंद्र सिंग Narendra Singh (वय-44) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ही कारवाई शनिवारी (दि.8) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास काळेवाडी येथील रिझवान ड्रेसेस (Rizwan Dresses Kalewadi) येथे केली. (Pune Pimpri Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे लेझिस्ट आयपीआर सर्व्हिस लि. (Legist IPR Services Ltd.) या कंपनीचे संचालक असून त्यांच्या कंपनीकडे एडिडास (Adidas), नाईकी (Nike), अंडर आर्मर (Under Armor), इंक (Inc), रिबॉक (Reebok), केलविन क्लेन (Calvin Klein) यासारख्या प्रसिद्ध कंपन्यांचे लोगे व ब्रँड नेमचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार आहे. फिर्यादी यांना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नामांकीत कंपन्यांचे नाव आणि लोगो वापरुन बनावट कपड्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.
फिर्यादी यांनी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त (DCP) यांच्याकडे तक्रार अर्ज केला होता. त्यानुसार पोलिसांनी फिर्यादी यांच्या मदतीने आरोपी इम्रान युनुस शेख याच्या रिझवान ड्रेसेस या दुकानात छापा टाकला. त्यावेळी आरोपीने नामांकित कंपन्याच्या नावाचा व चिन्हाचा वापर करुन बनावट टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट व जॅकेट असा एकूण 15 लाख 75 हजार रुपये किमतीता माल दुकानात विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आले. आरोपीने हे कपडे लुधीयाना पंजाब येथील शिव भोले याच्याकडून घेतल्याचे सांगितले.
ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक हाबळे (API Hable),
शस्त्र विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक देशमुख (API Deshmukh),
दरोडा विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक भांगे (PSI Bhange), पोलीस अंमलदार खारगे, पुलगम,
महिला पोलीस हवालदार लोमटे, गायकवाड, पोलीस नाईक शेंडगे, कोकणे शेख, अत्तार यांच्या पथकाने केली.
Web Title :- Pune Pimpri Crime | Shopping for clothes for Diwali! Sale of fake clothes of
a well-known company is taking place in Pimpri Chinchwad, seized goods worth 16 lakhs
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Mulayam Singh Yadav Passed Away | समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंह यादव यांचं निधन, 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
- Uddhav Thackeray | शिंदे गटाचा वापर केल्यानंतर भाजपा त्यांना लांब फेकणार, हे सांगण्यासाठी उद्धव ठाकरेंनी दिले ‘या’ अभिनेत्याच्या जाहिरातीचे उदाहरण
- Pune Crime | महिलेकडून न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची तरूणाला धमकी, धनकवडी परिसरात युवकाची आत्महत्या