Pune Pimpri Crime | अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या पत्नीचा गळा दाबून खून; घराला बाहेरुन कुलूप लावून पळून गेलेला पती नागपूरात ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime | अनैतिक संबंधात (Immoral Relationship) अडसर ठरणार्‍या पत्नीचा (Wife) गळा दाबून खून (Murder) करुन घराला बाहेरुन कुलूप लावून पती पळून गेल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस (Pune Pimpri Crime) आला आहे. नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) पती (Husband) व त्याच्या प्रेयसीला (Girlfriend) ताब्यात घेतले आहे.

 

किर्ती बेडेकर ऊर्फ किर्ती आशिष भोसले Kirti Bedekar alias Kirti Ashish Bhosale (वय 19, रा. येळवंडे एम्पायर, भुजबळ वस्ती, वाकड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी किर्ती हिच्या मामीने हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) फिर्याद (Pune Pimpri Crime) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आशिष भोसले (वय 23, रा. येळवंडे एम्पायर, भुजबळ वस्ती, वाकड) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किर्ती ही मुळची सातारा जिल्ह्यातील (Satara District) ठोसेघर येथे राहणारी होती. ती आपल्या मोठ्या बहिणीबरोबर लोणावळा (Lonavala) येथे रहात होती. गेल्या वर्षी ऑक्टोंबरमध्ये किर्ती ही घरातून पळून गेली. तिने आशिष भोसले याच्याबरोबर लग्न केले. आशिष भोसले हा मुळचा सासवड (Saswad) येथील राहणारा आहे. सहा महिन्यानंतर किर्ती ही फिर्यादी यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आली होती. त्यावेळी तिला कसे चालू आहे, असे विचारल्यावर ती रडु लागली. आशिष याचे ऑफिसमधील एका तरुणीशी अनैतिक संबंध आहेत. आपण त्यांना एक दोन वेळा बोलताना पाहिले होते. त्यामुळे तिने आशिष याला तिच्यासोबत का बोलतो, म्हणून विचारल्यावर त्याचा राग येऊन आशिष याने किर्ती हिला खूप मारहाण केली होती. तेव्हा फिर्यादी यांनी तिची समजूत काढली होती.

त्यानंतर 20 जुलै रोजी किर्ती भोसले रहात असलेल्या घराच्या शेजारी राहणार्‍याला घरातून वास आल्याने त्यांनी
पोलिसांना कळविले पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर आत किर्ती भोसले बेशुद्धावस्थेत आढळून आली होती.
हिंजवडी पोलिसांनी तिला तातडीने औंध हॉस्पिटलमध्ये (Aundh Hospital) आणले.
डॉक्टरांनी तपासणी पूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. किर्ती हिच्या गळ्यावर व्रण दिसून आला.
ओढणीच्या सहाय्याने आशिष याने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर तो घराला कुलूप लावून पळून गेल्याचे आढळून आले.

 

दरम्यान, त्याच दिवशी मारुंजी येथून एक तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांना मिळाली होती.
तिचा शोध घेत असताना ही तरुणी व आशिष भोसले हे दोघे नागपूरात असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी नागपूरमधील सीताबर्डी पोलिसांच्या (Sitabardi Police) मार्फत या दोघांना ताब्यात घेतले आहे.

 

आशिष भोसले याने बेपत्ता तरुणीला पत्नीने आत्महत्या केली असून तू सोबत आली नाही तर मी स्वत: आत्महत्या करेल,
अशी धमकी देऊन तिला बरोबर घेऊन तो नागपूरला आल्याचे या तरुणीने पोलिसांना सांगितले.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Strangling a wife who is an obstacle to an immoral relationship; The husband who fled after locking the house from outside is detained in Nagpur

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Ayurveda Tips | लठ्ठपणा कंट्रोल करण्यासाठी आयुर्वेदाचा आधार, जाणून घ्या कोणत्या गोष्टी खाल्याने कमी होते वजन

 

Pune Crime | सराफी दुकानातून 2 कोटी 60 लाखांचे 5 किलो सोन्याची बिस्किटे चोरुन नेणारी महिला गजाआड

 

CBSE 12th Result | सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल