Weight Loss Ayurveda Tips | लठ्ठपणा कंट्रोल करण्यासाठी आयुर्वेदाचा आधार, जाणून घ्या कोणत्या गोष्टी खाल्याने कमी होते वजन

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss Ayurveda Tips | आजकाल लठ्ठपणा ही एक मोठी समस्या आहे. लठ्ठपणा वाढल्याने अनेक आजारही शरीरात वाढू लागतात. वजन कमी करण्यासाठी लोक खुप काही करतात. यासाठी आयुर्वेदाची मदत घेऊनही तुम्ही वजन कमी करू शकता. आयुर्वेदानुसार, तुमच्या स्वयंपाकघर आणि घरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुमचे वजन कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे पोटाची अतिरिक्त चरबी हळूहळू कमी होऊ लागते. (Weight Loss Ayurveda Tips)

 

जर तुम्हाला आहार आणि व्यायामाने काही फरक पडत नसेल तर तुम्ही या टिप्सचा अवलंब करू शकता. यामुळे साहजिकच तुमचे वजन कमी होईल. यासाठी काय करायचे आहे ते जाणून घेवूयात…

1- वजन कमी करण्यासाठी, आयुर्वेदामध्ये हळद, आले आणि मध वापरण्याची शिफारस केली जाते. त्यामुळे पोटाची अतिरिक्त चरबी कमी होते. या तीन गोष्टी एकत्र वापरा. (Weight Loss Ayurveda Tips)

 

2- वजन नियंत्रित ठेवण्यासाठी लिंबू पाणी खूप उपयुक्त आहे. लिंबूपाण्यात पेक्टिन आणि पॉलिफेनॉल असतात, जे भूक कमी करणारे म्हणून काम करतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

 

3- बाला ही आयुर्वेदातील एक अशी औषधी वनस्पती आहे, जी वजन कमी करण्यास मदत करते.
यामध्ये अल्कलॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. याचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.

 

4- मध आणि दालचिनीचे सेवन केल्याने फॅट बर्न होते. यासाठी कोमट पाण्यासोबत मध आणि दालचिनीचा वापर करा.
तुम्हाला हवे असल्यास तुम्ही मध आणि लसूण देखील वापरू शकता.

 

5- मेथी वजन कमी करण्यात चमत्कारिक प्रभाव दाखवते. 1 ग्लास पाण्यात मेथीचे दाणे भिजवा, हे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्या.
यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. मेथीमुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि गॅसच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weight Loss Ayurveda Tips | ayurveda treatment for weight loss home remedies for fat reduce dieting tips

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

DA Hike | यावेळी 6 टक्के वाढू शकतो कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता, तुमच्या पगारात किती रुपयांची होई वाढ? जाणून घ्या

 

Metro Car Shed | CM एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, आरे कारशेडच्या कामावरील बंदी उठवली

 

RBI करणार आहे मोठी घोषणा ! येथे जमा केलेल्या पैशावर मिळेल मोठा फायदा, जाणून घ्या कसा