पुणे : लोधा टोळीच्या सराईत गुन्हेगाराकडून पिस्टल, काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

नवनाथ लोधा टोळीतील सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाकडून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराकडून ३५ हजार ६०० रुपयांचे एक गावठी पिस्टल आणि तीन काडतुसे जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि.१७) सायंकाळी पाचच्या सुमारास ससून रुग्णालयाजवळ करण्यात आली.
[amazon_link asins=’B01BKEZYBY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’54a2373a-a2d9-11e8-9702-ed8c1470d642′]

मंगेश बाळासाहेब तांबे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाचे पोलीस नाईक वल्सन डिसोझा यांना लोधा टोळीतील एक आरोपी ससून रुग्णालयाजवळ येणार असून त्याच्याजवळ पिस्टल असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहिती नुसार दरोडा प्रतिबंधक पथकाने ससून रुग्णालयाबाहेर सापळा रचला. मंगेश तांबे हा ससून रुग्णालयाच्या मेनगेट समोरील सार्वजनीक रोडच्या फुटपाथवर संशयास्पदरित्या उभा असल्याचे दिसून आला. पोलिसांनी छापा टाकून त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. अंगझडतीमध्ये त्याच्या कंबरेला असलेली एक गावठी बनावटी पिस्टल आणि कागदामध्ये गुंडाळलेले तीन काडतुसे असा एकूण ३५ हजार ६०० रुपयांचा ऐवज जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर अजय शिंदे याचेवर गोळीबार केल्याचा गुन्हा खडक पोलीस ठाण्यात दाखल आहे.
[amazon_link asins=’B07417987C’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5a8a3527-a2d9-11e8-a3a1-7d2453be6641′]

ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रदिप देशपांडे, पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे -१) समीर शेख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक फौजदार संजय दळवी, यशवंत आंब्रे, पोलीस हवालदार अजय थोरात, विल्सन डिसोझा, पोलीस नाईक अमोल पवार यांच्या पथकाने केली.