Pune PMC Action On Sanitation Workers | कचरा नदीत टाकणार्‍या महापालिकेच्या दोन सफाई सेवकांवर दंडात्मक कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Action On Sanitation Workers | एकीकडे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत महापालिका Pune Municipal Corporation (PMC) स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवत असताना त्यांचेच काही सफाई कर्मचारी कचरा नदीत टाकत असल्याचे समोर आले आहे. माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या कार्यालयातून यासंदर्भात व्हिडीओसह तक्रार आल्यानंतर प्रशासनाने या दोन्ही कर्मचार्‍यांना दंड ठोठावला आहे. (Pune PMC Action On Sanitation Workers)

घोले रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या परिसरात २ ऑक्टोबरला ही घटना घडली होती. महापालिकेच्या दोन सफाई सेवकांनी रस्ता झाडून कचरा गोळा केल्यानंतर तो नदी पात्रात होता. एका सजग नागरिकांने ही घटना मोबाईलच्या कॅमेर्‍यात कैद करत तो पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयाकडे पाठवून दिला. पाटील यांच्या कार्यालयातून यासंदर्भातील व्हिडीओ महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे पाठवून दिल्यानंतर त्या दोन सेवकांचा शोध घेउन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दोघांना प्रत्येकी ५०० रुपये दंड ठोठावण्यात आल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संदीप कदम (Sandeep Kadam) यांनी दिली. (Pune PMC Action On Sanitation Workers)

कदम यांनी सांगितले, की शहर स्वच्छता अभियानाअंतर्गत महापालिका विविध मोहीमा राबवत आहे. यामध्ये नागरिकांचा विशेषत: विद्यार्थ्यांचा सहभागही मोठा आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणार्‍या अथवा थुंकणार्‍यांवर कारवाईची मोहीम तीव्र करण्यात करण्यात आली आहे. एक ऑक्टोबरपासून तीनशेहून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दीड लाख रुपयांहून अधिक दंड वसुल करण्यात आला आहे. यासोबतच ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या वापरणार्‍यांवरही कारवाई करण्यात येत आहे.
आगामी सणासुदीच्या पार्श्‍वभूमीवर तसेच हिवाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणारे
तसेच कचरा पेटवून प्रदूषण करणार्‍यांवर देखिल कारवाईची मोहीम तीव्र करण्यात येईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PIL To Ban Loud DJs Sound System | आरोग्यावर परिणाम करणार्‍या कर्णकर्कश DJ वर बंदी
आणण्यासाठी राजकिय आणि सामाजिक कार्यकर्ते जनहीत याचिका दाखल करणार

Jayant Patil On Ajit Pawar | जयंत पाटील यांची अजित पवार गटावर बोचरी टीका;
म्हणाले – ‘अडचणीत गेल्यामुळे वळचणीला जाऊन बसावे लागले’