Pune PMC Anti-Encroachment Drive | स्थगिती उठताच एफसी रोडवर अतिक्रणावर कारवाई, 7000 चौरस फुट बांधकाम जमीनदोस्त (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Anti-Encroachment Drive | पुण्यातील फर्ग्युसन रोडवर (Ferguson Road) बांधकाम विकास विभागाने मोठी कारवाई केली आहे. शिरोळे प्लॉट येथील विनापरवाना शॉपिंग मॉलवर (Shopping Malls In Pune) ही कारवाई करण्यात आली. लोखंडी एंगल, गर्डर, पत्रे इत्यादीच्या सहाय्याने दोन मजली मॉल तयार करण्यात आला होता. या कारवाईत सात हजार चौरस फुट बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. (Pune PMC Anti-Encroachment Drive)

या मॉलमध्ये छोटी मोठी मिळून 70 स्टॉल वजा दुकाने सुरु होती. यावर कारवाई करण्यास न्यायालयाने स्थगिती दिली होती. यामुळे कारवाई (Pune Anti-Encroachment Drive) करता येत नव्हती. प्रशासनाने मोठे वकील देवून आठ वर्ष चाललेला आदेश उठवून घेतला. यानंतर लगेच उच्च न्यायालयात कॅवेट दाखल केले, आणि लगेच कारवाई केली. (Pune PMC Anti-Encroachment Drive)

विनापरवाना मॉल तयार करण्यात आल्यामुळे एफसी रोड वर वाहतुकीचा ताण येत होता. तसेच मॉलमध्ये हवा उजेडाची सोय नसल्याने आणि मॉल मध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहक आणि विक्रेते असल्याने आगी सारखी दुर्घटना घडली असती तर मोठ्या प्रमाणात जिवितहानी झाली असती.

या कारवाईत एक जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर, 15 बिगारी व पोलीस कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
डेक्कन पोलीस ठाण्याचे (Deccan Nagar Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपिन हसबनीस
(Sr PI Vipin Hasbanis) यांच्यासह पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
ही कारवाई अधीक्षक अभियंता युवराज देशमुख (PMC Yuvraj Deshmukh), कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे
(PMC Bipin Shinde) यांचे मार्गदर्शनाखाली उप अभियंता सुनिल कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे, समीर गड इ यांनी पूर्ण केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Sanjay Raut | राऊतांचा EVM वर संशय, म्हणाले – ”लोकांच्या मनात शंका, एक निवडणूक बॅलेट पेपरने होऊन जाऊ द्या”

Harshvardhan Patil | पुणे : हर्षवर्धन पाटलांनी उघड केले सध्याचे घसरलेले राजकारण, ”कोणाचा करेक्ट कार्यक्रम…”

Pune Crime News | एकटेपणातून वृद्धाने उचललं टोकाचं पाऊल, कोथरुड परिसरातील घटना