Pune PMC News | भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व हॉस्पीटल उभारणीची 109 कोटी रुपयांची निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवणार – रविंद्र बिनवडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पीटलच्या इमारतीच्या कामाला वेग मिळाला आहे. संगम ब्रिजजवळील डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या आवारात उभारण्यात येणार्‍या इमारतीच्या बांधकामासाठीची निविदा उघडण्यात आली आहे. लवकरच निवेदेला मान्यता देण्याची तांत्रिक प्रक्रिया पार पाडल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यात येईल. पुढील वर्षभरात ही इमारत उभी राहील, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade) यांनी दिली. (Pune PMC News)

 

पुणे महापालिकेने धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले आहे. महाविद्यालय सुरू झाले असून यंदा प्रथम वर्षासाठी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. सध्या कमला नेहरू रुग्णालय आणि बाबूराव सणस शाळेच्या आवारात उभारण्यात आलेल्या वर्गांमध्ये अध्यापन सुरू आहे. मात्र, टप्प्याटप्प्याने द्वितीय व पुढील वर्षाचे वर्ग सुरू करावे लागणार आहेत. डॉ. नायडू हॉस्पीटलच्या इमारतीमध्ये काही बदल करून द्वितीय वर्षाचे वर्ग सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचवेळी या हॉस्पीटलच्या आवारातील जागेवर महाविद्यालय आणि रुग्णालयासाठीची स्वतंत्र इमारत उभारण्यात येणार आहे. या इमारतीच्या कामासाठीची निविदा मागविण्यात आली होती. (Pune PMC News)

या निविदा प्रक्रियेत सात कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तांत्रिक पडताळणीनंतर या निविदा उघडण्यात आल्या आहेत.
त्यामध्ये जेनेरीक इंजिनिअरींग कन्स्ट्रक्शन ऍन्ड प्रोजेक्टस लिमिटेड या मुंबईतील बांधकाम कंपनीची निविदा सर्वात कमी
दराने अर्थात महापालिकेने जाहीर केलेल्या दरानेच आली आहे. सुमारे १०९ कोटी रुपयांची ही निविदा येत्या
स्थायी समिती बैठकीपुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येईल. स्थायीच्या मान्यतेनंतर तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात
कामाला सुरूवात करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी दिली.

 

Web Title :- Pune PMC News | Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Medical College and Hospital will be placed before the Standing Committee for approval of Rs 109 crore tender – Ravindra Binwade

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | धक्कादायक! बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस ठाण्यातच घेतले पेटवून; पिंपरी चिंचवडमधील घटना

Sanjay Raut | ‘काँग्रेसचे प्रयत्न कमी पडले, गुजरात भाजपकडे’ – संजय राऊत

Congress Leader Nana Patole | “भाजप सर्वकाही उद्योगपतींसाठी करत आहे”; धारावी पुनर्वसन प्रकल्प अदानीला, नाना पटोले यांची टीका