Pune PMC News | रूफटॉपवर बेकायदेशीररित्या हॉटेल व्यवसाय करणार्‍या 8 जणांविरोधात महापालिकेची फौजदारी कारवाई

पुढील आठवड्यापासून पुन्हा कारवाई सुरू करणार

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | टेरेसवर बेकायदेशीरपणे हॉटेल व्यवसाय करणार्‍या (illegal hotel business on terrace in pune) आठ जणांविरुद्ध महापालिकेच्या बांधकाम विभागाने फौजदारी गुन्हे दाखल केले आहे. पोलिस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने थंडावलेली कारवाई पुढील आठवड्यापासून पुन्हा सुरु केली जाणार आहे. (Pune PMC News)

 

काही महीन्यापुर्वी बाणेर (Baner) येथे एका इमारतीच्या टेरेसवर बेकायदेशीरपणे सुरु असलेल्या हॉटेलला आग लागली होती. यानंतर या टेरेसवरील हॉटेल्सचा प्रश्न एैरणीवर आला होता. या पार्श्वभुमीवर महापालिकेच्या बांधकाम विभागाने सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात आढळून आलेल्या बेकायदेशीर हॉटेल्स चालकांना नोटीस पाठविली गेली होती. त्यांना सदर बेकायदेशीर बांधकाम उतरवुन घेण्याचे आदेशही या नोटीसमार्फत दिले गेले होते. काहींनी कारवाईच्या भितीने बांधकामे उतरविली. तर काहींनी बेकायदेशीरपणे व्यवसाय सुुरुच ठेवला होता. (Pune PMC News)

 

तेहसीत हॉटेल्सवर कारवाई आणि आठ जणांविरुद्ध गुन्हा
महापालिकेने पाठविलेल्या नोटीस नंतरही हॉटेल व्यवसाय सुरु ठेवणार्‍या ३३ हॉटेल्सवर कारवाई केली गेली होती. या हॉटेल्सवर कारवाई करून तेथील अनधिकृत शेड, बांधकामे पाडली गेली होती. ही कारवाई केल्यानंतर काही जणांनी पुन्हा एकदा बांधकाम करून व्यवसाय सुरू केला होता. या प्रकारांना रोखण्यासाठी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतरही बांधकाम करून पुन्हा व्यवसाय सुरु करणार्‍या आठ जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल केला गेला आहे.

कारवाईसाठी हवा पोलिस बंदोबस्त
अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या बांधकाम विभागाला पोलिस बंदोबस्त आवश्यक असतो. गणेशोत्सवापुर्वी महापालिकेने ३३ हॉटेल्सवर कारवाई केली होती. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दिवाळी या सणांच्या कालावधीत पोलिस बंदोबस्त उपलब्ध न झाल्याने अनधिकृत हॉटेल्सची बांधकामे पाडण्याची कारवाई थंड झाली होती. आता पुन्हा एकदा पोलिसांकडे बंदोबस्त उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट केले गेले.

 

इतर खात्यातही हवा समन्वय
महापालिकेने अनधिकृत बांधकाम पाडल्यानंतर काही व्यावसायिकांनी न्यायालयाकडे दाद मागून कारवाईला स्थगिती मिळविली आहे.
तर नोटीस पाठविलेल्यांपैकी सहा जणांकडे परवानगी असल्याचे आढळून आले आहे.
महापालिकेचा बांधकाम विभाग, महसुल विभाग, महावितरण, अन्न व औषध प्रशासन या खात्यांमध्ये समन्वय निर्माण झाला तर टेरेसवरील अनधिकृत हॉटेल व्यावसायाला आळा बसू शकतो.
त्यादृष्टीने संबंधित विभागांना पत्र पाठविण्यासंदर्भात प्रशासन विचार करीत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 

टेरेसवर हॉटेल व्यवसाय करण्याची परवानगी मोजक्या जणांनी घेतली आहे.
काही जण पावसाळ्यापुरती शेड उभी करतात आणि नंतर ती कायम ठेवतात असे आढळून आले आहे.
काही जण कारवाई केल्यानंतर पुन्हा बांधकाम करीत असल्याचे आढळून आले आहे.
पुन्हा बांधकाम करणार्‍यांविरोधात आता फौजदारी गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

सुधीर कदम Sudhir Kadam PMC (अधिक्षक अभियंता, महापालिका )

 

Web Title :- Pune PMC News | Criminal action of Municipal Corporation against 8 people who are illegally running hotel business on rooftop

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | बांधकाम व्यावसायिकाच्या घरातून हिरेजडीत सोन्याची अंगठी लंपास

Gayatri Datar | गायत्री दातारचं टेलिव्हिजनवर कमबॅक; ‘या’ मालिकेतुन येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Kishori Pednekar | किशोरी पेडणेकरांची चौकशीनंतर प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘कर नाही त्याला डर…’