Pune PMC News | पुणे महापालिका २०२१ चा पर्यावरण अहवाल दिशादर्शका पेक्षा दिशाभूल करणारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | पुणे महापालिकेचा २०२१ या वर्षीचा पर्यावरण अहवाल आज महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये सादर करण्यात आला. परंतू तब्बल ६० लाख लोकसंख्येच्या शहरात २०११ च्या जणगणनेनुसार ३५ लाख लोकसंख्या गृहीत धरून दरडोई पाणी पुरवठा, सार्वजनिक वाहन व्यवस्था, वाहन संख्या, आरोग्य व्यवस्था आदींचे गणित मांडण्यात आले आहे. एकीकडे आंतरराष्ट्रीय संस्था भविष्यातील पुणे शहराची लोकसंख्या, हवामान, पाउस पाण्याची समस्या आदी गंभीर मुद्दे अधोरेखित करत असताना याचे प्रतिबिंब मात्र महापालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये दिसून येत नाही. त्यामुळे नेहमीप्रमाणेच कागदोपत्री आकडेवारीचे सोपस्कार पार पाडणारा २०२१ चा पर्यावरण अहवाल हा दिशादर्शकापेक्षा दिशाभूल करणारच असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. (Pune PMC News)

 

महापालिकेला दरवर्षी पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर करावा लागतो. हा अहवाल मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे. कोरोना काळात लॉकडाउन असल्याने या अहवालात शहरातील हवेची गुणवत्ता थोडी सुधारल्याचे नमूद केले आहे. शहरात महापालिकेने सुमारे २१० उद्याने विकसित केली असुन, शहराचे हरीत क्षेत्र हे १९ लाख ७८ हजार ८६६ चौरस मीटर इतके झाले आहे. तर शहराच्या जुन्या हद्दीत जी.आय.एस तंत्रज्ञानाचा वापर करून वृक्ष गणना केली गेली आहे. शहरात ५१ लाख ३ हजार ६०२ इतकी झाडे असुन, यामध्ये ४३० प्रजातींचा समावेश आहे. या अहवालानुसार शहरात सौर उर्जेचा वापर वाढत असल्याचे नमूद केले आहे. २०२०-२१ या वर्षात शहरात सौरउर्जेच्या माध्यमातून सुमारे १६ कोटी २० लाख ४२ हजार १४० युनिट वीजनिर्मिती झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. (Pune PMC News)

– अपारंपारीक उर्जेचा वापर वाढला 
शहरात सौर उर्जेचा वापर वाढला आहे. घरगुती आणि व्यावसायिक स्वरुपाचे, इतर स्वरुपात सौर पॅनेलचा वापर करून उर्जा निर्मिती करणार्‍या नागरीकांची संख्या वाढत चालली आहे. २०१९-२० मध्ये १२ कोटी १७ लाख ९५ हजार ६२२ युनिट वीज निर्मिती झाली होती. तीच संख्या २०२०-२१मध्ये १६ कोटी २० लाख ४२ हजार १४० इतकी झाली आहे. तर २०२१-२२ मध्ये ५८ हजार २२८ सोलर वॉटर हिटरच्या वापराची नोंद झाली आहे. महापालिकेने १.२५ मेगा वॅट क्षमतेचा सौर उर्जा प्रकल्प पुर्ण केला आहे, तर सुमारे १ लाख ८० हजार एल.ई.डी दिवे बसवुन वीज खर्चाच बचत केली आहे.

 

– ईव्ही वापर वाढतोय 
इलेक्ट्रीक वाहने वापरणार्‍यांची संख्या वाढत असुन, २०२० मध्ये १ हजार ४५० इतक्या इलेक्ट्रीक वाहनांची नोंद झाली होती. यामध्ये २०२१ मध्ये सव्वा चार पटीने वाढ झाली असुन, ही संख्या ६ हजार २१९पर्यंत पोचली आहे. शहराच्या सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेमधील पीएमपीएलच्या बसताफ्यात ३१० ईलेक्ट्रीक बस आहे. या बसची संख्या ६५० पर्यंंत वाढविण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे शहरातील वायु प्रदुषण कमी होण्यास मदत होणार आहे.

 

– हवेची गुणवत्ता थोडी सुधारली 
एअर क्वालिटी इंडेक्सनुसार शहरात २०२१ मध्ये सुक्ष्म धुलीकण या क्षेत्रीत एकही दिवस नोंदविला गेला नाही. वर्षभरातील ३६५ दिवसांपैकी १६३ दिवस हवा चांगली होती. तर अति सुक्ष्मकण या श्रेणीत २०२१ यावर्षी दोन दिवस हे पुवर या श्रेणीत नोंदविले गेले आहेत.

दीशादर्शनापेक्षा पर्यावरण अहवालातून दिशाभूलच अधिक
पुणे महापालिकेच्या २०२१ च्या पर्यावरण अहवालामध्ये २०११ च्या जणगणनेनुसार ३५ लाख ५६ लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे. यामध्ये मागील पाचवर्षात समाविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांतील लोकसंख्येचाही समावेश आहे. प्रत्यक्षात नुकतेच महापालिका निवडणुकीसाठी मतदारसंख्या ३५ लाख इतकी नोंदली गेली आहे. यामुळे १८ वर्षांखालील मुले आणि शिक्षण व नोकरी निमित्ताने येथेे राहात असलेले नागरिक अशी एकंदरीत लोकसंख्या ५० लाखांच्या पुढे गेली आहे. याचे स्पष्टीकरण अहवालामध्ये कुठेही देण्यात आलेले नाही. याउलट ३५ लाख लोकसंख्येच्या आधारेच दरडोई पाणी पुरवठा, वाहन, वृक्ष संख्या, सार्वजनिक वाहतूक सुविधा, आरोग्य सुविधा व अन्य बाबींची आकडेवारी देण्यात आली आहे.

 

नुकतेच अमेरिकेतील स्टेनफोर्ड विद्यापीठाच्या पर्यावरण विभागाच्या पथकाने पुण्याचा अभ्यास करून अहवाल महापालिका प्रशासनाला दिला आहे.
या अहवालामध्ये सध्याची पुण्याची शहरी लोकसंख्या ६० लाखांहून तीन दशकांत १ कोटी १५ लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
त्यांच्या अंदाजानुसार पुढील कालावधीत पुण्याचे तापमान २ अंश सेल्सिअसने वाढणार आहे.
पावसाचे प्रमाणही ७ टक्क्यांनी वाढणार आहे. तसेच वरचेवर दुष्काळही पडणार असल्याचे सूचित केले आहे.
बाहेरील देशातील संस्था येथे येउन अभ्यासाअंती निष्कर्ष काढत असताना महापालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये याचे साधे प्रतिबिंबही पडताना दिसत नाही.
यामुळे महाापलिकेचा पर्यावरण अहवाल हा दिशादर्शकापेक्षा दिशाभूलच करणारा असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.

 

Web Title :- Pune PMC News | Environment report of Pune Municipal Corporation 2021 is more misleading than guideline

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Tiger Shroff-Disha Patani Breakup | टायगर श्रॉफ-दिशा पटानीचे ब्रेकअप, 6 वर्षांच्या डेटिंगनंतर नाते संपले!

 

Bengal SSC Scam | माझ्या घराचा मिनी बँकप्रमाणे वापर करत होता पार्थ चटर्जी – अर्पिता मुखर्जीचा दावा

 

Shivsena Chief Uddhav Thackeray | पुण्यवान होण्यासाठी भाजपमध्ये जा, मुलाखतीतच उद्धव ठाकरेंचा संजय राऊतांना सल्ला?