Pune PMC News | पावसाळ्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्यांच्या नूतनीकरणासाठी; १०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | पावसाळ्यानंतर शहरातील सर्व महत्वाच्या डांबरी रस्त्यांचे रिसर्फेसिंग करण्यात येणार आहे. यासाठी १०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. नुकतेच ज्या डीफेक्ट लायबिलिटी पिरियड Defect Liability Period (डीएलपी-DLP) मध्ये खड्डे पडलेल्या रस्त्यांच्या ठेकेदारांविरूद्ध कारवाई करण्यात आली असून पुढील टप्प्यात डीएलपीमधील रिइनस्टेटमेंटची कामे तसेच ‘स’ यादीतून केलेल्या सदोष रस्त्यांची कामे करणार्‍या ठेकेदारांविरोधातही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar PMC Commissioner) यांनी दिली. (Pune PMC News)

 

नुकतेच झालेल्या पावसाळ्यामध्ये शहरातील बहुतांश रस्त्यांवर खड्डे पडले. चोवीस तास पाणी पुरवठा (Water Supply), केबल, ड्रेनेजलाईनच्या कामांमुळे या रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने पुणेकरांचे अक्षरश: कंबरडे मोडले. यावरून महापालिकेतील (Pune PMC News) सत्ताधारी आणि प्रशासनावर टीकेची झोड उडाली आहे. पावसाळ्यामध्ये ठिकठिकाणी पॅचवर्क करून प्रशासनाने तात्पुरता दिलासा देण्याचे प्रयत्न केले मात्र यानंतरही अनेक रस्त्यांवर आजही खड्डयांचे साम्राज्य आहे. यासोबतच महापालिका प्रशासनाने डीएलपी मध्ये असलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्यास ठेकेदार आणि अभियंत्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी थर्डपार्टी ऑडीट करून घेतले. यामध्ये दोषी आढळलेल्या १३ ठेकेदारांना सहा महिन्यांसाठी काळ्या यादीत टाकण्यात आले असून अभियंत्यांवर कारवाई प्रस्तावित केली आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्तांकडे विचारणा केली असता, ते म्हणाले की पावसाळ्यानंतर डांबरी रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी रिसर्फेसिंग करण्यात येणार आहे. यासाठी १०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच पाणी पुरवठा, केबल तसेच अन्य सेवा वाहीन्यांसाठी खोदाई केलेले रस्ते पुर्ववत करण्यासाठीच्या झोननिहाय निविदां प्रक्रिया सुरू करण्यात आली असून काहींना मान्यताही देण्यात आली आहे.
रस्त्यांवरील खड्डयांचे ऑडीट करताना रिइन्स्टेटमेंटची कामे झालेल्या रस्त्यांसोबतच क्षेत्रिय कार्यालयांकडून करण्यात आलेल्या रस्त्यांचेही ऑडीट करण्यात आले आहे.
या रस्त्यांवर खड्डे आढळल्यास तसेच कोणी पुन्हा बेकायदा खोदकाम केल्याचे आढळल्यास संबधित ठेकेदार अथवा विभागावरही कारवाई करण्यात येईल.

 

डीएलपीमध्ये असलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याने प्रशासनाने १३ ठेकेदारांविरूद्ध कडक कारवाई केली आहे.
त्यांना सहा महिन्यांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. परंतू यापैकी काही ठेकेदारांनी त्यांनी ज्या रस्त्यांचे कामच केले
नाही किंवा अन्य विभागाच्या खोदाईमुळे खड्डे पडल्याचा आरोप करत पुराव्यांसह पत्रही दिली आहेत.
त्या रस्त्यांची पुन्हा पाहाणी करून कारवाईबाबतचा उचित निर्णय घेण्यात येईल. – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

 

Web Title :- Pune PMC News | for renovating major roads in the city after monsoons; 100 crore will be spent – Vikram Kumar, Municipal Commissioner

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Chhagan Bhujbal | छगन भुजबळांनी हिंदू समाजाची माफी मागावी, अन्यथा…, भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांचा इशारा

Sunny Leone | बापरे! सनी लिओनीच्या नावाने होतेय मोठी फसवणूक; अभिनेत्रीने स्वत:च केलं अलर्ट, म्हणाली…

Pankaja Munde | ‘…तर मोदीही मला संपवू शकत नाही’, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर विधानसभेचा दाखला देत बंधू धनंजय मुंडे म्हणाले…