Pune PMC News | नदी पात्रातून मेंहदळे गॅरेज चौकाकडे जाणार्‍या वाहनचालकांसाठी खूशखबर ! रजपूत वसाहतीतील रस्त्याचे रुंदीकरण होणार; वसाहतीतील 33 घरांचे पुनर्वसन करून रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | नदी पात्रातील रस्त्यावरून म्हात्रे पुल आणि एरंडवण्याकडे जाणार्‍या राजपूत वसाहत (Rajput Vasahat) येथील रस्ता रुंदीकरणाचा मार्ग अखेर दीर्घकाळानंतर मोकळा झाला आहे. राजपूत वसाहतीतील ३३ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यात येणार असून येथील सुमारे १५० मी लांबीचा रस्ता रुंद होणार असल्याने कर्वे रस्त्याला पर्यायी रस्ता मिळणार आहे. (Pune PMC News)

 

शिवाजीनगर तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातून कर्वेनगर, एरंडवणा आणि राजाराम पूल मार्गे सिंहगड रस्ता परिसरात जाणार्‍या नागरिकांसाठी मुठा नदी पात्रातील टिळक पूल ते म्हात्रे पूलादरम्यानचा नदी पात्रातील रस्ता साधारण २० वर्षांपासून वरदान ठरला आहे. परंतू या रस्त्यावर म्हात्रे पुलाजवळ असलेल्या राजपूत वसाहत येथून मेंहदळे गॅरेज चौकाकडे जाणारा रस्ता अगदीच अरूंद आहे. काही ठिकाणी या रस्त्याची रुंदी ५ मी. असून काही ठिकाणी ६ मी. आहे. या रस्त्यावरून एखादे तीन चाकी अथवा चार चाकी वाहन गेले तरी काही वेळातच कोंडी होते. त्यामुळे गेली अनेक वर्षे रजपूत वसाहत येथे रस्त्याच्या मधोमध लोखंडी अडथळे उभारून केवळ दुचाकींसाठीच रस्ता खुला ठेवण्यात आला होता. (Pune PMC News)

रजपूत वसाहत येथील रस्त्याचे रुंदीकरण करावे यासाठी महापालिका प्रशासनासोबतच स्थानीक नगरसेवक अनेक वर्षे पाठ पुरावा करत होेते.
प्रशासनाने वसाहतीतील जागा मालक आणि भाडेकरूंशी सातत्याने चर्चा करून अखेर यातून मार्ग काढला आहे.
नदी पात्रापासून मेहेंदळे गॅरेज चौकापर्यंतच्या १५० मी. परिसरातील सुमारे ३३ घरांची जागा ताब्यात घेण्यात येत आहेत.
येथील नागरिकांचे पुनर्वसन अन्यत्र करण्यात येणार असून त्यांना त्यानुसार सदनिकाही देण्यात आल्या आहेत.
लवकरच या नागरिकांचे स्थलांतर करण्यात येणार असून तातडीने रस्त्याचे कामही पुर्ण करण्यात येणार आहे.
रस्ता रुंदी करणानंतर हा रस्ता सुमारे १० मी. रुंद होणार असून दोन लेन मधून वाहनांची ये- जा होईल अशी माहिती महापालिकेच्या अधिकार्‍यांनी (PMC Officers) दिली.

मध्यवर्ती शहरातून एरंडवणा, कर्वेनगर, कोथरूड, सिंहगड रोड कडे जाणार्‍या आणि विरूद्ध बाजूने
शहरात येणार्‍या छोट्या वाहनांसाठी पर्यायी रस्ता मिळणार आहे. यामुळे कर्वे रस्त्यासोबतच परिसरातील नागरिकांना एक पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

 

Web Title :- Pune PMC News | Menhdale Garage Chowk! Road widening in Rajput colony;
Road widening by rehabilitating 33 houses in the colony

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा