Pune PMC News | रुफटॉप हॉटेलला ‘बार’चा परवाना देताना महापालिकेचे ‘ना हरकत ’प्रमाणपत्र बंधनकारक करावे

महापालिकेचे जिल्हाधिकारी आणि अबकारी विभागाला पत्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | रुफटॉप आणि साईड मार्जिनमध्ये चालविण्यात येणार्‍या रेस्टारंट, हॉटेल, बार यांना (Roof Top Restaurants In Pune) चाप बसविण्यासाठी महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) आता जिल्हा प्रशासन, अबकारी विभाग यांच्याकडे धाव घेतली आहे. अशा प्रकारचा परवाना देताना महापालिकेची एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) घेण्याचे बंधन घालण्यात यावे अशी मागणी केली आहे. (Pune PMC News)

शहरात टेरेस, इमारत, बंगला आदींचे साईड मार्जिन मध्ये मोठ्या प्रमाणावर हॉटेल (Roof Top Hotels In Pune) व्यवसाय बेकायदेशीरपणे सुरु आहे. प्रामुख्याने काही ठिकाणी पब्ज व हुक्का पार्लरही चालविलेले जातात. मागील वर्षभरात कोंढवा आणि औंध येथे रुफटॉप हॉटेल्समध्ये आगीच्या घटना घडल्या. यानंतर चौफेर टीका झाल्याने महापालिकेच्या बांधकाम विभागाने ८७ हॉटेलवर कारवाई करून अनधिकृतपणे उभारलेल्या शेड पाडून टाकल्या होत्या. त्यानंतरही काही व्यावसायिकांनी पुन्हा शेड उभ्या करून हॉटेल सुरु केले आहेत. महापालिकेच्या मिळकत कर विभागाने देखील चारशेहून अधिक अशा मिळकतींवर कारवाई केली आहे. महापालिका सातत्याने कारवाई करीत असली तरी, व्यावसायिकांकडून अनधिकृतपणे टेरेस आणि साईड मार्जिंनच्या जागेचा व्यावसायिक वापर सुरु आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आता महापालिकेने जिल्हा प्रशासन आणि अबकारी विभागाची मदत घेण्याचा प्रयत्न केला आहे. (Pune PMC News)

यासंदर्भात आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) म्हणाले,
कारवाई केल्यानंतरही पुन्हा बांधकाम करून व्यवसाय सुरु ठेवला जातो.
अशा हॉटेल, रेस्टारंट अँड बारला अबकारी विभागाकडून परवाना दिला जातो, तसेच जिल्हा प्रशासनाकडूनही परवाना दिला जातो. हा परवाना देताना महापालिकेची एनओसी घेणे संबंधित व्यावसायिकांना बंधनकारक केले जावे. यामुळे अनधिकृत बांधकाम असलेल्या ठिकाणी व्यवसाय सुरु करता येणार नाही. या प्रकारांना आळा बसेल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

NCP MP Supriya Sule | ‘राष्ट्रवादीत फूट नाही, अजित पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते’, सुप्रिया सुळेंचे मोठे विधान (व्हिडीओ)

Chandrashekhar Bawankule | ‘फोडाफोडीचे संस्कार कुणाचे हे देशाला आणि…’, सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर बावनकुळेंचा पलटवार

Bhau Kadam | भाऊ कदमचे झाले आहे ‘लव्ह मॅरेज’; आपल्याच विद्यार्थिनीच्या प्रेमात पडला भाऊ, हटके लव्ह स्टोरी