Pune PMC News – Parvati Hill | ‘पर्वती हिलटॉप हिलस्लोपवरील जागा रहिवासी करून मूळ मालकाला देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी नको’ – सर्वोच्च न्यायालय

महापालिका आणि राज्य शासनाला मोठा दिलासा

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News – Parvati Hill | पर्वती येथील उद्यानाच्या आरक्षणापोटी ६६ हजार ३७२ चौरस मीटर ताब्यात घेतलेली जागा मूळ मालकाला परत करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करू नये असे फेरआदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने महापालिकेला Pune Municipal Corporation (PMC) मोठा दिलासा मिळाला आहे. ही जागा मूळ मालकाला परत देण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये आदेश दिले होते. या आदेशाविरोधात महापालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या पुनरावलोकन याचिकेवर (रिव्हिजन पिटिशन) आज सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjaya Y. Chandrachud) यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे आज झालेल्या सुनावणीवेळी हे फेरआदेश देण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या मुख्य विधी अधिकारी अ‍ॅड. निशा चव्हाण (Adv Nisha Chavan) यांनी दिली. (Pune PMC News – Parvati Hill)

 

ऑगस्टमध्ये यासंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल शहरातील डोंगरमाथा-डोंगरउतार क्षेत्रात (हिल टॉप-हिल स्लोप) मोडणार्‍या ७५० हेक्टर जमिनीवर बांधकामे होण्यास कारणीभूत ठरणार असल्याची प्रतिक्रिया बांधकाम क्षेत्रातून उमटली होती. त्यामुळे महापालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या पुनरावलोकन याचिकेला महत्व प्राप्त झाले होते. महापालिकेने २००४मध्ये पर्वती येथील उद्यानासाठी संपादित केलेल्या १६ एकर जागेचा मोबदला देण्याबाबत २०१२मध्ये सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयाने या खटल्याचा निकाल ऑगस्टमध्ये दिला होता. त्यामध्ये महापालिकेने ताब्यात घेतलेली जागा मूळ मालकांना परत करण्याबरोबरच १८ वर्षांच्या खटल्याच्या भरपाईपोटी प्रत्येकी एक कोटी असे एकूण १८ कोटी रुपये देण्याचे निर्देशही दिले.

 

याशिवाय ही जमीन रहिवासी केल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम करण्यास एक प्रकारे परवानगीही दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या हा निकाल महापालिका; तसेच राज्य सरकारला मोठा धक्का होता. या पार्श्वभूमीवर या निकालाच्या विरोधात पुनरावलोकन याचिका (रिव्हिजन पिटिशन) दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुनरावलोकन याचिकेवर महापालिकेच्यावतीने सिनिअर कौन्सील माधवी दिवाण आणि ऍड. मकरंद आडकर यांनी महापालिकेची बाजू मांडली, अशी माहिती ऍड. निशा चव्हाण यांनी दिली. (Pune PMC News – Parvati Hill)

बीडीपी आणि डोंगरमाथा-उतार क्षेत्र
पुणे शहराच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात टेकड्या, डोंगर आहेत.
महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार ७५० हेक्टर जमिनीवर डोंगरमाथा-उतार क्षेत्राचे;
तर ९७८ हेक्टर क्षेत्रावर जैवविविधता उद्यांनासाठी राखीव (बीडीपी) अशी आरक्षणे आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पर्वती येथील जमिनीबाबत दिलेल्या निकालामुळे या ठिकाणीही बांधकाम करणे शक्य आहे का,
याची चाचपणी जमीन मालकांकडून सुरू झाली आहे. पर्वती येथील डोंगरमाथा-उतारावर बांधकामास परवानगी दिली गेली;
तर त्याचा फायदा इतर क्षेत्रालाही मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.
पर्वती येथील जमिनीवर बांधकाम करण्याबाबत महापालिकेपुढे प्रस्ताव आल्यानंतर त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल,
अशी प्रतिक्रिया उच्चपदस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune PMC News – Parvati Hill | ‘Supreme Court should not implement the order to give the land on Parvati hilltop hillslope to the original owner as a resident’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | धक्कादायक! बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने पोलीस ठाण्यातच घेतले पेटवून; पिंपरी चिंचवडमधील घटना

Sanjay Raut | ‘काँग्रेसचे प्रयत्न कमी पडले, गुजरात भाजपकडे’ – संजय राऊत

Congress Leader Nana Patole | “भाजप सर्वकाही उद्योगपतींसाठी करत आहे”; धारावी पुनर्वसन प्रकल्प अदानीला, नाना पटोले यांची टीका