Pune PMC News | जी-२० परिषदेसाठी पुणे महापालिकेची लगबग ! शहर सुशोभिकरणासाठी उद्योजक, बँकांची मदत घेणार – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | पुढीलवर्षी जानेवारीमध्ये जी २० परिषदेच्या पुणे शहरात होणार्‍या बैठकींच्या तयारीसाठी पुणे महापालिकेने कंबर कसली आहे. राज्याच्या अप्पर मुख्य सचिवांनी काल या तयारीचा आढावा घेतला. या बैठकीच्या अनुषंगाने शहरातील सुशोभिकरणासाठी महापालिका उद्योजक आणि बँकांची देखिल मदत घेणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी दिली. (Pune PMC News)

 

पुढीलवर्षीच्या जी २० परिषदेचे यजमान पद भारताकडे आहे. याअंतर्गत पुण्यातही जानेवारी आणि जूनमध्ये या परिषदेच्या तीन बैठका होणार आहेत. या बैठकीसाठी विविध १०० हून अधिक देशांचे प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर शहराचा मेकओव्हर करण्याच्या दृष्टीने महापालिका प्रयत्नशील आहे. या पार्श्‍वभुमीवर पुण्यातील ६० चौक आणि आयलँडचे सीएसआरच्या माध्यमातून ब्युटीफिकेशन करण्यात येणार असून ५२ ठीकाणी कामेही सुरू झाली आहेत. यासोबतच पुढील काही दिवसांत सुशोभिकरणाच्या कामासाठी शहरातील उद्योजक आणि मोठ्या बँकांच्या पदाधिकार्‍यांची देखिल बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती विक्रम कुमार यांनी दिली. (Pune PMC News)

 

विक्रम कुमार यांनी सांगितले, की यानिमित्ताने ऐतिहासिक शनिवार वाड्यातील लाईट ऍन्ड साउंड शोचे नूतनीकरण करण्यात आले आहे. तसेच १५ जानेवारीपर्यंत नदी काठ सुधार योजनेतील पहिल्या टप्प्यातील सॅम्पल स्ट्रेचचे काम पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. नदी काठ सुधार योजनेची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी औंध येथील सयाजीराव गायकवाड भवनमध्ये या योजनेची मॉडेल्स, छायाचित्र तसेच व्हिज्युअल शोचे काम देखिल ३१ डिसेंबरपर्यत पूर्ण करण्यात येईल. यासोबतच परदेशी पाहुण्यांच्या विमानतळ ते बैठकीच्या सेनापती बापट रस्त्यावरील जे.डब्ल्यू. मेरियट या मार्गावरील रस्ते, रस्ते दुभाजक, उद्याने, प्रकाश व्यवस्था याची कामे करण्याच्या दृष्टीने येत्या एक दोन दिवसांत संबधित विभागांच्या प्रमुखांचा संयुक्त पाहाणी दौराही आयोजित करण्यात आला आहे.

पुण्यामध्ये नदी महोत्सावासाठी देशातील ३३ शहरातील प्रतिनिधी उपस्थित राहाणार
केंद्राच्या ‘महुआ’च्या वतीने नदी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महापालिकेला पुण्यामध्ये हा महोत्सव आयोजन करण्याची संधी मिळाली आहे.
जानेवारीमध्ये होणार्‍या या नदी महोत्सवामध्ये महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या नदी सुधार व नदीकाठ सुधार योजनेचे सादरीकरण केले जाणार आहे.
तसेच इतर शहरांकडूनही सुरू असलेल्या उपाययोनांचा उहापोह यावेळी होणार्‍या परिषदेमध्ये होईल.
यातून संकल्पनांचे आदान प्रदान आणि सुधारणा करण्याची चांगली संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

 

Web Title :- Pune PMC News | Pune Municipal Corporation ready for G-20 conference! Entrepreneurs will seek help from banks for city beautification – Vikram Kumar, Municipal Commissioner

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Kriti Sanon | प्रभासबरोबर अफेअरच्या चर्चांवर क्रिती सेनॉनचा मोठा खुलासा; इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट शेअर करत सोडले मौन

Shreyas Talpade | अल्लू अर्जुनला आवाज देणाऱ्या मराठमोळ्या श्रेयस तळपदेनं मुलाखतीदरम्यान ‘या’ गोष्टीचा केला खुलासा

Nadav Lapid | ‘नदाव लॅपिड म्हणजे इस्रायलमधील जितेंद्र आव्हाड’ – अतुल भातखळकर