Pune PMC News | बोपोडी- सांगवी दरम्यानच्या मुळा नदीवरील पुलाचा निम्मा खर्च पुणे महापालिका करणार; पिंपरी चिंचवड महापालिकेला कामाचे 18.13 कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC News | पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला जोडणार्‍या बोपोडी- सांगवी या मुळा नदीवरील पुलाचे (Bopodi Sangvi Bridge) काम पुणे Pune Municipal Corporation (PMC) आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. या कामाची निविदा पिंपरी चिंचवड महापालिका राबविणार असून यासाठी येणार्‍या खर्चाची निम्मी रक्कम त्यांना देण्यासाठीचा ठराव स्थायी समितीपुढे (PMC Standing Committee) मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. (Pune PMC News)

 

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला जोडणारा बोपोडी ते सांगवी दरम्यान मुळा नदीवर (Mula River Bridge) पुल बांधण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्यावतीने या कामासाठीची निविदा मागीलवर्षीच (PCMC Tender) काढली आहे. सुमारे ७६० मी. लांब आणि १८.६० मी. रुंदीच्या या पुलासाठी पुणे महापालिकेच्या बाजूने अर्थात बोपोडीमध्ये ५५५ मीटरचा अप्रोच रस्ता असून सांगवीच्या बाजूला ८० मी.चा अप्रोच रस्ता आहे. या पुलाच्या कामासाठी ३६ कोटी २५ लाख रुपये खर्च आहे. यापैकी निम्मे अर्थात १८ कोटी १३ लाख रुपये पुणे महापालिकेने पिंपरी चिंचवड महापालिकेला द्यायचे आहेत. ही रक्कम पिंपरी चिंचवड महापालिकेला देण्यासाठीचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे.

 

या पुलाच्या अप्रोच रस्त्यासाठी महापालिकेला औंध येथील बॉटनिकल गार्डन येथील स.नं. २५ मधील १७ हजार ५५० चौ. मी. जागा संपादीत करावी लागणार आहे. शासनाच्या या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही जागा संपादीत होताच पुलाच्या कामाला सुरूवात होणार आहे. काम सुरू झाल्यानंतर दोन वर्षात काम पुर्ण होईल, असा विश्‍वास महापालिकेच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

 

साधू वासवानी रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्निमाणाची निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे कोरेगाव पार्क (Koregaon Park)
येथील धोकादायक झालेला बहुचर्चित साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल (Sadhu Vaswani bridge)
पाडून त्याठिकाणी नवीन उड्डाणपूल बांधण्यासाठीची ५६ कोटी रुपयांची निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवण्यात आली आहे.
मे.एस.एम.सी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.ची (SMC infrastructures Pvt. Ltd.) ही निविदा आहे.
कोरेगाव पार्क ते बंडगार्डन (Koregaon Park To Bundgarden) पूलादरम्यानच्या वाहतुकीमध्ये साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल महत्वाचा दुवा आहे.
परंतू हा पूल जुना असल्याने वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. महापालिकेने या पुलावरील जड वाहतूक यापुर्वीच बंद केली
असून गेली काही वर्षे जुना पूल पाडून नवीन पूल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू होते.
परंतू रेल्वे विभागाची परवानगी, मेट्रो प्रकल्पाच्या (Pune Metro Project) कामामुळे बंडगार्डन रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्‍न असा
सर्वच गोष्टींचा विचार करून साधू वासवानी पुलाच्या कामाला विलंब झाला आहे.
रेल्वेची परवानगी व मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविली आहे,
अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.

 

Web Title :- Pune PMC News | Pune Municipal Corporation will pay half of the cost of the bridge over Mula river between Bopodi-Sangvi; The proposal to pay Rs 18.13 crore to the Pimpri Chinchwad Municipal Corporation for work is before the Standing Committee

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | पुणे पोलिसांकडून बनावट निकाहनामा बनवून तरूणीची बदनामी करणार्‍याला बुलढाण्यातून अटक

NCP Chief Sharad Pawar | शरद पवारांची मोठी घोषणा, म्हणाले – ‘मी राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सोडणार’ (Video)

Awami Mahaz Pune | आझम कॅम्पस : ‘अवामी महाज’ च्या ईद मिलन मध्ये रंगली संगीत संध्या !