Pune PMC Property Tax | पाच लाखांहून अधिक पुणेकरांवर ‘मिळकत कराची’ टांगती तलवार ! रद्द केलेली 40 टक्के सवलत पुर्ववत करण्यास राज्य सरकार उदासीन

मार्चमध्ये चक्रवाढ व्याजासह मिळकत कर भरावा लागण्याची पुणेकरांणा भिती

 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Property Tax | पुणेकरांच्या मिळकत करातील ४० टक्के कर सवलतीबाबतचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी पत्र पाठवूनही राज्य शासनाने (Maharashtra State Government) त्यावर अद्याप निर्णय घेतलेला नाही. अशातच आर्थिक वर्ष संपायला अवघा दीडच महिना उरल्याने या संदर्भातील निर्णय न झाल्यास तब्बल ५ लाख मिळकतधारकांना दंडासह मिळकतकराची थकबाकी भरावी लागणार आहे. (Pune PMC Property Tax)

 

राज्य शासनाच्या आदेशानुसार पुणे महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) हद्दीतील सुमारे ५ लाख ४ हजार मिळकतींची मिळकत करात देण्यात येणारी ४० टक्के सवलत रद्द करण्यात आली आहे. तर २०१९ पासून नवीन आकारणी करण्यात आलेल्या मिळकतींना ४० टक्के सवलतीचा लाभ देण्यात येत नाही. महापालिकेने जुन्या मिळकतधारकांकडून २०१९ पासून ४० टक्के सवलतीची वसुली केल्याने ५ लाख ४ हजार पुणेकरांना २०२२-२३ या आर्थिक वर्षापासून थकबाकीसह मोठ्या रकमेची बिले आली आहेत. मिळकत करावरून नागरिकांच्या तीव्र भावना आहेत. यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पाच महिन्यांपुर्वी नागरिकांनी वाढीव मिळकत कर भरू नये आणि महापालिकेने देखिल तगादा लावू नये. यासंदर्भात लवकरच निर्णय घेउ असे आश्‍वासन दिले होते. (Pune PMC Property Tax)

परंतू हे आश्‍वासन देउनही ५ महिने उलटले आहेत. २०२२-२३ हे आर्थिक वर्ष पुढील महिन्यांत अर्थात ३१ मार्चला संपणार आहे. मिळकत करातील सवलतीबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी, असे पत्र महापालिकेने राज्य सरकारला देखिल पाठविले आहे. उप सचिवांनी अशी बैठक बोलविण्याचे तोंडी आदेशही दिले आहेत. मात्र, अद्याप ही बैठक झाली नाही. यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशामुळे मिळकत कर न भरणार्‍या लाखो नागरिकांच्या पोटात गोळा आला आहे. मार्च अखेर निर्णय न झाल्यास या नागरिकांना मागील सहा महिन्यांपासून दरमहा २ टक्के चक्रवाढ पद्धतीने थकबाकी भरावी लागणार आहे. थकबाकीची ही रक्कम अगदी काही हजारांपासून लाखो रुपयांमध्ये असेल. यानंतर १ एप्रिलपासून २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा बोजा येउन पडणार आहे. त्यामुळे लाखो पुणेकर हवालदील झाले आहेत.

 

पुणेकरांवर ‘जिझिया’ कराची टांगती तलवार
नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनाने पिंपरी चिंचवड महापालिकेतील बेकायदा मिळकतींच्या थकबाकीदारांवर आकारलेला शास्तीकर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.
परंतू यासंदर्भातील अध्यादेश काढलेला नाही. दुसरीकडे पुणे महापालिकेने आकारलेला मिळकत कर अधिक
असल्याची तक्रार आल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवाची उरूळी आणि फुरसुंगी ही दोन्ही गावे
महापालिकेतून वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका करण्याचा निर्णय घेतला.
परंतू वर्षानुवर्षे प्रामाणिकपणे मिळकत कर भरणार्‍या पुणेकरांना करात देण्यात येणारी ४० टक्के सवलत काढून घेत पुणेकरांवर आर्थिक बोजा वाढविल्याप्रकरणी कुठलाच निर्णय अद्याप घेतलेला नाही.
त्यामुळे लाखो पुणेकरांवर ‘जिझिया’ कराची टांगती तलवार अद्यापही कायम आहे.

 

Web Title : – Pune PMC Property Tax | More than five lakhs of Punekar hanging sword of Property Tax ! Maharashtra state government is reluctant to restore the canceled 40 percent discount

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर अनिल परब यांचे मोठे विधान, म्हणाले – ‘त्यामुळे हा खटला…’

Police Inspector Transfer | नाशिक परिक्षेत्रामधील 7 पोलिस निरीक्षकांच्या परिक्षेत्रांतर्गत बदल्या

Chhagan Bhujbal | उद्धव ठाकरेंनी राजीनामा देण्याची घाई केली नसती तर…, छगन भुजबळांचे मोठे विधान (व्हिडिओ)