Pune Pmc Property Tax | मिळकतींच्या सर्वेक्षणात घोळ घालणार्‍या आयटी कंपनीला बिल दिल्यास आंदोलन करणार – शहर काँग्रेस

बिलासाठी महापालिका प्रशासनावर दबाव टाकणार्‍या मंत्र्याचे नाव जाहीर करावे - नागरी हक्क समितीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pmc Property Tax | मिळकतींच्या सर्वेक्षणात घोळ घालून मिळकत कर विभागाला (Pune PMC Property Tax Department) अडचणीत आणल्याने कारवाई झालेल्या ‘आयटी’ कंपनीला (IT Company) मंत्र्याच्या दबावाखाली ८ कोटी रुपयांचे बिल दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेसने (Congress) दिला आहे. तर नागरी हक्क संस्थेने (Nagari Hakka Sanstha Pune) याप्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून संबधित आयटी कंपनीला बिल देण्यासाठी धडपडणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करावी आणि संबधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली आहे. (Pune Pmc Property Tax)

 

पुणे महापालिकेने Pune Municipal Corporation (PMC) उत्पन्न वाढीसाठी शहरातील आकारणी न झालेल्या, वापरातील बदल व अन्य बदल झालेल्या मिळकती जीआयस मॅपिंगद्वारे शोधून त्या आकारणीखाली आणण्याचे काम २०१६ मध्ये एका आयटी कंपनीला दिले होते. या कंपनीने अनेक चुकीच्या नोंदी केल्याचे नागरीकांच्या तक्रारीनंतर प्रशासनाच्या फेरतपासणीत उघड झाले. त्यामुळे महापालिकेने या कंपनीचे ८ कोटी रुपये बिल दिले नाही. हे बिल मिळावे यासाठी संबधित कंपनीने राज्यातील एका वजनदार नेत्याच्या माध्यमातून महापालिकेकडे तगादा लावला आहे. मंत्र्याच्या फोननंतर महापालिकेतील वरिष्ठ स्तरावरील यंत्रणा ते बिल ‘कायद्यात’ बसविण्यासाठी जोरबैठका करत आहे. याबद्दलचे वृत्त पोलीसनामा ऑनलाइनने सर्वप्रथम दिले. यावरून खळबळ उडाली आहे. (Pune Pmc Property Tax)

 

शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind Shinde) यांनी यासंदर्भात आयुक्तांना निवेदन दिले आहे. सदर आयटी कंपन्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) गुन्हा दाखल आहे. या कंपन्यांच्या कामाची महापालिकेच्या दक्षता विभागामार्फत चौकशी (Pune Mahapalika Dakshata Vibhag) झाली असून त्याचा अहवाल तयार केला आहे. महापालिका आयुक्तांनी हा चौकशी अहवाल जाहीर करावा. या कंपनी विरोधात गुन्हा दाखल झाला असताना व चौकशीत दोषी आढळले असतानाही त्या कंपनीचे गोठविलेले ८ कोटी रुपये देण्यासाठी तसेच आणखी काम देण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोणाच्या दबावाखाली पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी केल्यास आंदोलन करण्यातचा इशारा दिला आहे.

Advt.

नागरी हक्क संस्थेचे अध्यक्ष काका कुलकर्णी (Kaka Kulkarni, President of Nagari Hakka Sanstha Pune)
यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)
यांना निवेदन दिले असून संबधित आयटी कंपनीच्या चुकीमुळे लाखो पुणेकरांना मानसिक त्रास सोसावा लागला आहे.
या कंपनीला काळ्या यादीत टाकावे. महापालिकेने या कंपनीचे बिल द्यावे तसेच कंपनीला आणखी काम द्यावे
यासाठी कोणता मंत्री महापालिका प्रशासनावर दबाव टाकत आहे याची चौकशी करून त्याचे नाव जाहीर करावे अशी मागणी केली आहे.

 

Web Title :  Pune PMC Property Tax | Pune City Congress will protest if
IT company is billed for tampering with income survey

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा