Pune PMC Recruitment 2022 | पुणे महापालिका मेगाभरती ! अर्जांमध्ये त्रुटी आढळलेल्या ‘त्या’ 300 उमेदवारांनाही संधी दिली जाणार

येत्या एक दोन दिवसांत प्रशासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC Recruitment 2022 | पुणे महापालिकेच्यावतीने अभियंते, लिपिकांसह विविध पदांसाठी होणार्‍या मेगाभरतीसाठी आलेल्या ८८ हजार अर्जांपैकी सुमारे ३०० हून अधिक अर्जांमध्ये काही त्रुटी आढळल्याने हे विद्यार्थी परिक्षेला मुकणार ? असा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र, प्रशासनाने किरकोळ स्वरूपातील त्रुटी दूर करण्याची संधी देउन या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू द्यावे? असा सकारात्मक विचार सुरू केला असून यावर येत्या एक दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता आहे. (Pune PMC Recruitment 2022)

 

पुणे महापालिकेचा आकृतीबंध मंजुर झाल्यानंतर अनेक वर्षांनी अभियंते, लिपिक व अन्य विभागातील सुमारे ४४० पदांसाठी मेगाभरती होणार आहे. यासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून अर्ज मागविण्यापासून परीक्षा घेणे आणि निकाल जाहीर करण्यासाठी अनुभवी कंपनीची नियुक्ती केली आहे. या पदांसाठी राज्यभरातून सुमारे ८८ हजार उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. या अर्जांपैकी सुमारे ३०० हून अधिक उमेदवारांच्या अर्जांमध्ये फोटो लोड न होणे, स्वाक्षरी मध्ये फरक असणे अशा किरकोळ त्रुटी आढळल्या आहेत. अर्जातील त्रुटींमुळे हे उमेदवार परीक्षेस मुकणार? अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. (Pune PMC Recruitment 2022)

 

महापालिका प्रशासनाने या उमेदवारांना न्याय देण्याच्या दृष्टीने सकारात्मक विचार सुरू केला आहे. ऑनलाईन अर्ज करताना डॉक्युमेंट, फोटो अपलोड न होणे, डिजिटल स्वाक्षरी करताना फरक दिसणे या सारख्या त्रुटी दूर करण्याची संबधित विद्यार्थ्यांना संधी द्यावी. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करून तसे प्रतिज्ञापत्र घेउन त्यांना परीक्षेस बसू देण्यात अडचण येणार नसल्याबाबत प्रशासन सकारात्मक विचार करत आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर एक दोन दिवसांत निर्णय अपेक्षित असल्याची माहिती महापालिकेच्या अधिकार्‍याने दिली.

दरम्यान, परीक्षेसाठी मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा लागणार आहे.
पुणे शहरामध्ये एकावेळी चार ते साडेचार हजार विद्यार्थ्यांची परीक्षा घेता येणार आहे.
त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावरील उमेदवारांची परीक्षा अनेक सेशन्समध्ये घेण्याबाबत विचार सुरू आहे.
हे करत असताना परीक्षेत विचारले जाणारे प्रश्‍न वेगवेगळे असले तरी त्यांची काठीण्यपातळी एकसारखीच राहील,
याकडे बारकाईने लक्ष राहील यासाठीही आमचे प्रयत्न आहेत.
लवकरच याचे नियोजन करून पुढील काही आठवड्यांत परीक्षा घेण्यात येईल, अशी माहिती या अधिकार्‍याने दिली.

 

Web Title :- Pune PMC Recruitment 2022 | Pune Municipal Mega Recruitment 2022! ‘Those’ 300 candidates whose applications were found to have errors will also be given a chance

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold-Silver Price Today | सोने-चांदीच्या दरात आज पुन्हा झाला बदल, जाणून घ्या नवीन दर

 

Pune Crime | मोबाईल टॉवरच्या बीटीएस बॉक्समधून बेस बँड मशीनची चोरी करणारी टोळी गजाआड

 

Pune DPDC News | डीपीडीसीकडून आरोग्य सुविधांसाठी 12 कोटी 68 लाखांचा निधी