Pune PMC School Teacher Demand | पुणे महापालिका शाळेतील शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा आंदोलन करण्यात येईल; राज्य प्राथमिक शिक्षक संघाचा प्रशासनाला इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune PMC School Teacher Demand | महापालिकेच्या (Pune Corporation) शाळांमधील शिक्षकांचे प्रलंबित प्रश्‍न तातडीने सोडवावेत अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पुणे शहर (Maharashtra State Primary Teachers Association Pune) शाखेने केली आहे. हे प्रश्‍न न सोडविल्यास महापालिका भवन (Pune Mahapalika Bhavan) समोर आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक संघाच्यावतीने देण्यात आला आहे. (Pune PMC School Teacher Demand )

 

शिक्षक संघाच्यावतीने महापालिका प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून त्यामध्ये प्रलंबित मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने इंग्रजी माध्यमाच्या रिक्त पदांवर संच मान्यतेनुसार २०१२ पासून प्रलंबित असलेली शिक्षक भरती तसेच मुख्याध्यापकांच्या सुमारे १०० रिक्त पदांवर शिक्षकांना पदोन्नती द्यावी. मराठी व उर्दू माध्यमांच्या शाळेतील मुख्याध्यापकांच्या रिक्तपदांवर २०१६ पासून प्रलंबित असलेला पदोन्नतीचा प्रश्‍न मार्गी लावावा. सर्व माध्यमांतील शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी विना अट मंजूर करावी. मराठी माध्यम विज्ञान विषय पदवीधर व इंग्रजी माध्यम पदवीधर रिक्त पदांवर संच मान्यतेनुसार पदोन्नती द्यावी. (Pune PMC School Teacher Demand)

१९७७ च्या ठरावानुसार प्राथमिक शिक्षकांना केंद्र शासनाप्रमाणे महागाई भत्ता लागू करण्यात यावा.
कोविड काळात शिक्षकांचा कपात केलेला पगाराचा फरक जमा करावा. १ जानेवारी २०१६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना ७ व्या वेतन आयोगानुसार पेन्शन सुरू करावी.
कोविड ड्युटी उन्हाळी सुट्टीत काम केलेला कालावधी अर्जित रजेत परावर्तीत करावा या प्रामुख मागण्या करण्यात आल्या आहेत.
शिक्षक संघाचे अध्यक्ष रविंद्र सातकर, सरचिटणीस महेंद्र दळवी आणि शिक्षक नेते सचिन डिंबळे यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत.

 

 

Web Title :- Pune PMC School Teacher Demand | The pending demands of Pune Municipal School teachers should be resolved immediately otherwise agitation will take place Maharashtra State Primary Teachers Association Pune

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा