बिल्डर राजेश कानाबार यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यासह चौघांना पुणे पोलिसांकडून अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – बिल्डर राजेश हरिदास कानाबार (वय ६३) यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यासह चौघांना पुणे पोलिसांनी अटक केली. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या काही अंतरावर झालेल्या या खूनमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. त्यातील सर्व आरोपी अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी राहुल कांबळे, रुपेश कांबळे, गणेश गुर्हे आणि गोळ्या झाडणारा हसमुख पटेल यांना अटक केली आहे. याबाबत विश्वास गंगावणे (वय 32) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश हे इमारत सुशोभिकरणाचे व्यावसायिक होते. त्यांचे बावधन येथील १० एकर जागेसंदर्भात काहीजणांशी वाद सुरु होते. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरू आहे. सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होती. त्यासाठी कानाबार हे आले होते. त्यांनी त्यांची कार आयुक्ताल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर एसीआय बँकेच्या कॉर्नरला उभी केली होती. चालक कारमध्ये होता.सुनावणी झाल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर येउन पायी रस्त्याने कारकडे चालत आले. कारमध्ये बसण्यासाठी उभा असतानाच शासकीय कोषागारजवळ चालत आलेल्या हल्लेखोऱ्याने त्यांची गोळी झाडून हत्या केली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. तसेच संशयित असणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर एकाला पकडण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. तीन जणांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले. मात्र गोळीबार करणाऱ्या हल्लेखोर पसार झाला होता. त्याचा शोध घेतला होता.

दरम्यान हसमुख पटेल याची माहिती मिळाली. त्यानुसार त्याला पकडण्यात आले आहे. चौघांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांनी जमिनीच्या वादातून खुन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अधिक तपास बंडगार्डन पोलीस करत आहेत.