Pune : चोरीच्या गुन्ह्यातील फरारी सहा वर्षांनतर अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चहाचे 8 लाखांचे बॉक्स चोरीप्रकरणात गेल्या 6 वर्षांपासून फरार असणाऱ्या चोरट्याला पकडण्यात यश आले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

राजू कुशलराम चौधरी (वय २८, रा. उरूळी कांचन ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
कात्रज चौकात पार्क केलेल्या ट्रकमधून नामांकित चहाच्या कंपनीचे ८ लाखांचे बॉक्स चोरट्याने चोरुन नेले होते. त्यानंतर पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जात होता.

ट्रकमधील चहाचे बॉक्स चोरणारा फरारी आरोपी राजू चौधरी मार्केटयार्ड परिसरात येणार आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, पोलीस निरीक्षक वसंत कुंवर, उपनिरीक्षक भूषण कोते, कुंदन शिंदे, सचिन पवार, राहूल तांबे, देशमुख यांच्या पथकाने केली.