Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : ऑनलाइन जुगाराचा नादच खुळा ! गॅम्बलिंगच व्यसनापोटी घरफोडया करणार्‍यास अटक, 21 लाखाचा माल जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime Branch News | ऑनलाइन बिंगो अ‍ॅपवर (Online Bingo App) जुगार खेळण्याचा (Gambling) नाद लागलेल्या एका सराईत गुन्हेगाराने घरफोडी (Gharphodi) चोर्‍या करून मिळालेली रक्कम जुगारात उडविल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेच्या युनिट-5 ने घरफोडया करणार्‍या सराईतास अटक केली असून त्याच्याकडून 20 लाख 92 हजार रूपयाचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. (Pune Police Crime Branch News)

मुकेश बबन मुने Mukesh Baban Mune (26, रा. सुतारदरा, कोथरूड – Sutardara Kothrud) आणि त्याचा मित्र नितीन सुरेश बागडे Nitin Suresh Bagde (32, रा. कवडे गल्ली, नालेगाव, जि. अहमदनगर – Ahmednagar) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मार्च 2023 मध्ये वानवडी पोलिस स्टेशनच्या (Wanwadi Police station) हद्दीतील सोपानबाग सोसायटीमध्ये (Sopanbaug Society) घरफोडी झाली होती. त्यामध्ये चोरटयाने तब्बल 40 लाख रूपयाचा ऐवज लंपास केला होता. गुन्हयाचा समांतर तपास गुन्हे शाखेचे युनिट-5 करीत होते. (Pune Police Crime Branch News)

गुन्हे शाखेच्या युनिट-5 च्या पथकाने पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले शहरातील 100 पेक्षा अधिक सराईत गुन्हेगारांची तपासणी केली. त्यावेळी आरोपी मुकेश बबन मुने हा मिळुन आला नाही. त्यामध्ये त्याची सखोल माहिती घेतली असता तो भिवंडी (Bhiwandi ) येथे राहण्यासाठी गेला असल्याची माहिती समजली. पोलिसांनी भिवंडी येथे जाऊन माहिती घेतली असता तो आणि त्याचा मित्र नितीन सुरेश बागडे हे पुण्यात आल्याचे समोर आले. त्यांचा शोध घेतला असता पोलिसांना ते दोघेही चंदनगर-खराडी बायपास येथे मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवुन सखोल चौकशी केली असता त्यांनी सोपानबाग सोसायटीमध्ये चोरी केल्याचे कबुल केले.

चोरलेले सोने नितीन बागडे हा अहमदनगर येथील ओळखीच्या सोनारांना विकत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी अहमदनगरमध्ये जावुन तेथील सोनाराकडून एकुण 20 लाख 92 हजार रूपयाचा माल जप्त केला. आरोपी मुकेश मुने हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द आतापर्यंत तब्बल 35 गुन्हे दाखल आहेत.

पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे (IPS Ramnath Pokale), पोलिस उपायुक्त अमोल झेंडे
(DCP Amol Zende), सहाय्यक पोलिस आयुक्त नारायण शिरगांवकर (ACP Narayan Shirgaonkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक उल्हास कदम (PI Ulhas kadam),
सहाय्यक पोलिस निरीक्षक कृष्णा बाबर (API Krishna Babar), सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश लोहोटे
(API Avinash Lohote), पोलिस अंमलदार रमेश साबळे, प्रताप गायकवाड, विनोद शिवले, शशिकांत नाळे,
अकबर शेख, दयाराम शेगर, राहुल ढमढेरे, प्रमोद टिळेकर आणि संजयकुमार दळवी यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.

Web Title :-  Pune Police Crime Branch News | Online gambling is open! Gambling addict burglar arrested, goods worth 21 lakh seized

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime Branch News | पुणे पोलिस क्राईम ब्रँच न्यूज : दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक-2 कडून 7 गुन्हे उघडकीस

Maharashtra Politics News | ‘मविआचे नेते शिंदे-फडणवीसांच्या संपर्कात, हे जबाबदारीने सांगतोय’

Devendra Fadnavis | ‘आम्ही जे केलंय ते सगळं…’, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान (व्हिडिओ)