Pune Police Crime Branch | ‘मोक्का’ गुन्ह्यातील फरार आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे पोलीस आयुक्तांनी पुणे शहरातील गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. वारजे भागात दहशत माजवणाऱ्या गौरव पासलकर टोळीविरोधात (Gaurav Pasalkar gang)  मोक्का कारवाई (MCOCA Action) Mokka करण्यात आली होती. या गुन्ह्यातील फरार आरोपीच्या गुन्हे शाखेच्या (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक (Anti-ransom squad) एकने मुसक्या आवळल्या आहेत. गुन्हे शाखेने (Pune Police Crime Branch) ही कारवाई बुधवारी (दि. 6) पवार वस्ती दापोडी येथे केली.

पल्लु कमलेश चौधरी (वय-21 रा. चंद्रभागा व्हिला सोसायटी, दांगट पाटील नगर, शिवणे, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने त्याचे साथीदार मंगेश विजय जडीतकर, गौरव सुरेश पासलकर, राजू लक्ष्मण गेहलोत यांच्या मदतीने एका युवकावर तीक्ष्ण हत्याराने वार करुन लुटले होते. त्यांच्यावर वारजे पोलीस ठाण्यात (Warje Malwadi police station) गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या टोळीवर मोक्का कारवाई करण्यात आली आहे.

गुन्हे शाखाचे (Pune Police Crime Branch) खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस अधिकारी व कर्मचारी रेकॉर्डवरील पाहिजे, फरार, तडीपार आरोपींचा शोध घेत होते. त्यावेळी पोलीस हवालदार अतुल साठे (Police Head Constable Atul Sathe) व प्रवीण राजपूत (Praveen Rajput) यांना वारजे येथील गुन्ह्यातील आणि मोक्क्यातील पाहिजे असलेला आरोपी पल्लू चौधरी हा आपली ओळख लपवून दापोडी येथील पवार वस्ती येथे राहत असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला अटक केली. पुढील तपासासाठी त्याला वारजे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त गुन्हे भाग्यश्री नवटके (IPS Bhagyashree Navatke),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गुन्हे 1 लक्ष्मण बोराटे (ACP Laxman Borate)
यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक वेताळ (Senior Police Inspector Vinayak Vetal),
पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव (PSI Vikas Jadhav), पोलीस अंमलदार प्रविण राजपूत, अतुल साठे, नितीन कांबळे,
रमेश चौधर, गजानन सोनवलकर, अमर पवार यांच्या पथकाने केली.

Web Title :- Pune Police Crime Branch | Pune police crime branch arrest criminal who abscond in mcoca

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ ! जाणून घ्या पुण्यातील नवीन दर

Facebook ने सांगितले का डाऊन झाला होता सर्व्हर, काही तासातच झाला होता 447 अरब रुपयांचा तोटा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 2,876 रुग्णांची नोंद, जाणून घ्या इतर आकडेवारी