Pune Police Crime News | ‘मै टफ क्लास मास्टर हू, काम ही चाहता हू, काम ही करके लुगां’ ! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची सराईत गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम, 3 हजार 700 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Crime News | मै टफ क्लास मास्टर हू, काम ही चाहता हू, काम ही करके लुगां, असं पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सर्व संबंधित प्रभारी अधिकार्‍यांना सुनावलं आहे. गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याबाबत आणि सराईतांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी यापुर्वी वेळावेळी दिलेले आहे. आता पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr) यांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यासाठी विशेष मोहिम (Pune Police Special Mission) हाती घेतली आहे. त्यानुसार मागील काही दिवसांत तब्बल 3 हजार 700 रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive Action) केली आहे. कोम्बिंग ऑपरेशन (Pune Police Combing Operation) अंतर्गत कारवाई (Pune Police Crime News) केली जात असताना पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहिमेद्वारे कारवाईचा बडगा उगारला आहे.

 

पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्तांनी शरिराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे, संघटीत गुन्हेगारी करणाऱ्या सराईत गुन्हेगारंच्या हालचालीवर लक्ष ठेवून गुन्हेगारी कमी करण्यावर भर दिला आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगार तसेच सराईत गुन्हेगार यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन, गुन्हेगार चेकींग, गुन्हेगार आदान-प्रदान अशा योजना राबवण्यात येत आहेत. (Pune Police Crime News)

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरातील 9 गुन्हेगारी टोळ्यांमधील
65 गुन्हेगारांवर मोक्का काद्यांतर्गत कारवाई (MCOCA Action) Mokka केली आहे. तर 3 गुन्हेगारांना स्थानबद्ध केले आहे. यामध्ये दोन जणांना कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात (Kolhapur Central Jail)
तर एकला नाशिक मध्यवर्ती कारागृहात (Nashik Central Jail) स्थानबद्ध करण्यात आले आहे.
तर 42 गुन्हेगारांना पुणे शहर, पुणे जिल्हा व पुणे पिंपरी-चिंचवड हद्दीतुन तडीपार केले आहे.

 

पोलीस आयुक्तांनी पुणे शहरात दहशत निर्माण करणाऱ्या व सक्रिय अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबले आहे.
यापुढे सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई केली जाणार आहे.

 

Web Title :- Pune Police Crime News | Police Commissioner Ritesh Kumar’s special campaign against pune criminals, preventive action against 3 thousand 700 criminals

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Bachchu Kadu | ‘मंत्रिमंडळ विस्तार केला नाही तर…’, बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

Vanita Kharat | वनिता खरातच्या उखाण्याने वेधले सर्वांचे लक्ष; म्हणाली “सुमित तूच माझा महाराष्ट्र…”

Pune Pimpri Chinchwad Crime | भागिदार आणि कर्मचाऱ्याकडून कंपनीला 3 कोटींचा गंडा, भोसरी एमआयडीसी परिसरातील प्रकार

Pune Crime News | बेधूंद वातावरणात लोणावळ्यातील व्हिस्प्रींग वुड हॉटेलमध्ये सुरु होता अश्लिल डान्स ! पुणे ग्रामीण पोलिसांनी बंद केली छमछम; 53 जणांवर कारवाई, 9 महिलांचा समावेश