Pune Police MCOCA Action | औंध रोड, खडकी परिसरात संघटित गुन्हेगारी करणार्‍या मांडा टोळीवर मोक्का, पोलिस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून आतापर्यंत 104 टोळयांवर मोक्का

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | औंधरोड (Aundh Raod Pune) आणि खडकी (Khadki) परिसरात संघटित गुन्हेगारी करणार्‍या टोळीविरूध्द पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत तब्बल 104 संघटित गुन्हेगारी करणार्‍या टोळयांवर मोक्का अंतर्गत कारवाई केलेली आहे. (Pune Police MCOCA Action)

टोळी प्रमुख शुभम शाम कवाळे उर्फ मांडा (28, रा. 39, औंध रोड, चव्हाण वस्ती, बोपोडी, पुणे), विकी रिचर्ड नादन (29, रा. सर्व्हे नं. 38, औंधरोड, भाऊपाटील, पडयाळवस्ती, बोपोडी, पुणे), अनुज वाघमारे, मोहित सावंत, अतीक गरूड, रोहन ठोकळे आणि एका अल्पवयीन मुलावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी शुभम शाम कवाळे उर्फ मांडा आणि विकी रिचर्ड नादन यांना पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत. (Pune Police MCOCA Action)

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 13 नाव्हेंबर 2023 रोजी फिर्यादी हे खडकी परिसरातील औंधरोड येथील पडाळ वस्ती येथील चड्डा यांच्या कबुतराच्या ढाबळीतील कबुतरे पाहण्यासाठी मित्रांसह गेले होते. तेथे मांडा आणि सॅमुअल पाटोळे आणि त्यांच्या इतर साथीदार उभे होते. जुन्या भांडणावरून चिडून जावून आरोपींनी फिर्यादीला येथे कशाला आलात असा प्रश्न विचारला. त्यानंतर पाटोळेने फिर्यादीच्या डोक्यात कोयत्याने वार केले. याप्रकरणी खडकी पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दालख आहेत.

दरम्यान, पोलिसांच्या सखोल तपासांत आरोपी मांडा याने संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून तो बेकायदेशीर मार्गाने स्वतःसाठी आणि अन्य कोणत्याही व्यक्तीसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा व इतर फायदा मिळविण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी करण्यासाठी टोळीचा वापर करीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी वेळावेळी प्रतिबंधात्मक कारवाई करून देखील टोळीतील आरोपींनी पुन्हा-पुन्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले आहेत.

खडकी पोलिस स्टेशनचे (Khadki Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे (Sr PI Rajendra Sahane) यांनी मांडा टोळीविरूध्द मोक्का कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate) यांच्या मार्फत अप्पर पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma) यांच्याकडे पाठविला. प्रस्तावाची छाननी करण्यात आली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मांडा टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांनी आतापर्यंत 104 संघटित गुन्हेगारी टोळयांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे.

ही कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त (अति.कार्य.) रामनाथ पोकळे,
अप्पर आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलिस उपायुक्त शशिकातं बोराटे,
सहाय्यक पोलिस आयुक्त आरती बनसोडे (ACP Arti Bansode)
यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि राजेंद्र सहाणे, पोनि (गुन्हे) मानसिंग पाटील,
पोलिस उपनिरीक्षक मालोजी कांबळे, संभोष भांडवलकर, सर्वेलन्स अंमलदार रमेश जाधव,
महिला अंमलदार किरण मिरकुटे आणि स्वाती म्हस्के यांच्या पथकाने केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Will Ashok Chavan Join BJP? | अशोक चव्हाण भाजपात जाणार? भाजपा खासदाराच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा

Swargate To Katraj Metro | स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करा – अजित पवार

Attack On Retired Police Inspector In Pune | पुण्यात निवृत्त पोलिस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला,
दगडाने मारहाण, प्रकृती चिंताजनक

Gangadham Hilltop Hill Slope Zone | गंगाधाम येथील हिलटॉप, हिलस्लोपवरील बेकायदा शोरूम्स, गोदामांविरोधात मनपा प्रशासन मोहीम उघडणार

महिलेला बस सुरु करण्यास सांगणे बेतले जिवावर, स्कूल बसचे चाक अंगावरुन गेल्याने चालकाचा मृत्यू;
चाकण येथील घटना

Pune News | पुण्यातील मद्यप्रेमींना शासनाकडून खुशखबर, ‘या’ तीन तारखांना पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार बीअर बार