Swargate To Katraj Metro | स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करा – अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Swargate To Katraj Metro | स्वारगेट ते कात्रज मेट्रोचे काम लवकर सुरू करण्याचे नियोजन करावे, या मार्गाला केंद्र शासनाची मान्यता मिळाल्यावर राज्य सरकारच्या हिश्श्यातील निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. (Swargate To Katraj Metro)

मेट्रो मार्ग आणि अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant), आमदार सुनील टिंगरे (MLA Sunil Tingre) , भीमराव तापकीर (MLA Bhimrao Tapkir), पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (IAS Vikram Kumar), जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख (IAS Dr Rajesh Deshmukh), पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल (IAS Rahul Mahiwal), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण (IAS Ramesh Chavan), महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakne), महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ (Atul Gadgil) आदी उपस्थित होते. (Swargate To Katraj Metro)

उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गासाठी केंद्र शासन स्तरावर आवश्यक मान्यतेसाठी पाठपुरावा करण्यात येईल. या मेट्रो मार्गावरील स्थानके अत्याधुनिक सुविधांनी युक्त करावी. रामवाडी येथून विमानतळापर्यंत मेट्रो लाईन सुविधा देण्याचा विचार व्हावा.

अहमदनगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी तेथील रस्ते आणि पुलांच्या कामांना गती द्यावी. संगमवाडी ते खराडी रस्त्याचे भूसंपादन करण्याची कार्यवाही लवकर करावी. नगररोड परिसरातील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी. पोलीस विभागाने या भागात वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

मंत्री सामंत म्हणाले, नगर रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची कार्यवाही तातडीने करावी. या मार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

बैठकीत महामेट्रोचे (MahaMetro) व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर (IAS Shravan Hardikar)
यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करतांना स्वारगेट ते कात्रज
मेट्रो मार्गाच्या प्रगतीबाबत माहिती दिली.
या मार्गाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाकडे विचाराधीन आहे.
लवकरच त्यास मान्यता मिळाल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाची त्याला मान्यता मिळेल, यानंतर या मार्गावरील काम सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Attack On Retired Police Inspector In Pune | पुण्यात निवृत्त पोलिस निरीक्षकावर प्राणघातक हल्ला,
दगडाने मारहाण, प्रकृती चिंताजनक

Gangadham Hilltop Hill Slope Zone | गंगाधाम येथील हिलटॉप, हिलस्लोपवरील बेकायदा शोरूम्स, गोदामांविरोधात मनपा प्रशासन मोहीम उघडणार

महिलेला बस सुरु करण्यास सांगणे बेतले जिवावर, स्कूल बसचे चाक अंगावरुन गेल्याने चालकाचा मृत्यू;
चाकण येथील घटना

Pune News | पुण्यातील मद्यप्रेमींना शासनाकडून खुशखबर, ‘या’ तीन तारखांना पहाटे पाचपर्यंत सुरू राहणार बीअर बार