Pune Police MCOCA Action | वाहनांची तोडफोड करणाऱ्या सुरज पंडीत व त्याच्या 10 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 86 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | हडपसर परिसरातील गोसावी वस्ती वैद्यवाडी येथे जुन्या भांडणातून 22 वाहनांची तोडफोड करुन दहशत माजवणाऱ्या सुरज पंडीत व त्याच्या इतर 10 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी पदभार स्वीकारल्यापासून 86 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का (Pune Police MCOCA Action) कायद्यान्वये कारवाई केली आहे.

हडपसर परिसरातील गोसावी वस्ती वैद्यवाडी येथे जुन्या भांडणातून टोळक्याने हातात धारदार शस्त्रे घेऊन 22 वाहनांची तोडफोड केली. ही घटना 25 ऑक्टोबर रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी यश जावळे, युवराज बढे, सुरज पंडीत, समीर बागवान, अक्षय राऊत, शिवा कानगुले यांच्यासह 3-4 अनोळखी व्यक्तींवर आयपीसी ३९५,३२३,४२७,५०४,५०६, आर्म ॲक्ट ४/२५, क्रिमीनल लॉ अमेंडमेंट कलम ३, ७ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१)(३)/१३५ नुसार हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान टोळी प्रमुख सुरज रमेश पंडीत Suraj Ramesh Pandit (वय-29 रा. हांडेवाडी रोड, हडपसर), यश प्रदीप जावळे Yash Pradeep Jawle (वय-23 रा. सातवनगर रोड, हडपसर), युवराज प्रकाश बढे (वय-23 रा. मोहम्मदवाडी, हडपसर) यांना अटक केली आहे. तर अक्षय राऊत (रा. महंमदवाडी रोड, पुणे), समीर बागवान (रा. महंमदवाडी रोड, पुणे), शिवा कानगुले (रा. चिंतामणी नगर, हांडेवाडी रोड, पुणे) व इतर चार ते पाच जण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आरोपी सुरज पंडीत याने गुन्हेगारी टोळी तयार करुन हडपसर, काळेपडळ, गोसावी वस्ती, हांडेवाडी रोड या भागात टोळीचे वर्चस्व वाढवण्यासाठी संघटीत गुन्हे केले आहेत. तसेच आरोपींनी परिसरात कोयते दाखवून खंडणी उकळणे, लहान-मोठे व्यावसायिक व दुकानदार तसेच पथारीवाले यांना दमदाटी करुन त्यांच्या मनात दहशत निर्माण करुन हप्ता वसुल करणे यासारखे गुन्हे केले आहेत. तसेच आरोपींवर पुणे शहर, पुणे ग्रामीण मधील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपी यश जावळे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध धारदार शस्त्राने जीवे मारणे, जबर दुखापत करणे, जबरी चोरी, खंडणी गोळा करणे, दहशत निर्माण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. (Pune Police MCOCA Action)

हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke)
यांनी परिमंडळ- 5 पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh)
यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar) यांना सादर केला होता.
या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली.
पुढील तपास हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त संदिप कर्णिक (IPS sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, परिमंडळ- 5 पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख,
सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख (ACP Ashwini Rakh) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके,
पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे (PI Vishwas Dagle), पोलीस निरीक्षक गुन्हे संदिप शिवले (PI Sandeep Shivale),
सहायक पोलीस निरीक्षक सारिका जगताप, पोलीस उप निरीक्षक महेश कवळे, निगराणी पथकातील पोलीस अंमलदार प्रवीण शिंदे,
महेश उबाळे, राजश्री खैरे, वसीम सय्यद, गिरीश एकोर्गे, बाबा शिंदे, हनुमंत झगडे यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले – ‘वर्षा’ शेवटी…