Pune Police MCOCA Action | वानवडी परिसरातील शुभम उर्फ चम्या कांबळे याच्यासह इतर 3 जणांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 57 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police MCOCA Action | दुचाकीस्वाराला मारहाण करुन खिशातून जबरदस्तीने पैसे काढून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या वानवडी परिसरातील शुभम उर्फ चम्या संजय कांबळे याच्यासह इतर तीन साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 57 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

दुचाकीवरुन घरी जेवण करण्यासाठी जात असताना आरोपींनी दुचाकीला धक्का देऊन गाडीची चावी काढून घतली. तसेच फिर्यादी यांच्या खिशातून जबरदस्तीने 1100 रुपये काढून घेत लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिविगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देऊन दुचाकी नेली. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात आयपीसी 392,34 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 31 ऑगस्ट रोजी हडपसर रामटेकडी (Hadapsar Ramtekdi) येथील वंदे मातरम चौकात घडला आहे.

याप्रकरणाचा तपास करुन पोलिसांनी टोळी प्रमुख आणि पाहिजे असलेला आरोपी शुभम उर्फ चम्या संजय कांबळे (वय-19 रा. कुंजीरवाडी ता. हवेली), टोळी सदस्य टिल्ली उर्फ इरफान गुलाम मोहम्मद शेख (वय-19 रा. रामटेकडी, हडपसर), मंगेश रवि जाधव (वय-20 रा. रामटेकडी, हडपसर), फिटर प्रेम्या उर्फ प्रेम अनिल थोरात (वय-19 रा. नवीन म्हाडा कॉलनी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.

आरोपी शुभम उर्फ चम्या कांबळे याने संघटित टोळी तयार करुन टोळीचे परिसरात वर्चस्व व दहशत निर्माण करण्यासाठी गुन्हे केले आहेत. या टोळीने गेल्या दहा वर्षात संघटितपणे व वैयक्तीकपणे खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, बेकायदेशीर हत्यार बाळगणे, लुटमार करणे, लोकांना दमदाटी करणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्यावर शरीरा विरुद्ध व मालमत्ते विरुद्ध चे गुन्हे दाखल असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे वारंवार केले आहेत.

वानवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii), 3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांनी परिमंडळ-5 पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा यांना सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (IPS Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख (DCP Vikrant Deshmukh),
वानवडी विभागाचे सहायक पोलीस आयुक्त शाहुराजे साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरीक्षक विनय पाटणकर,
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव शेलार पोलीस अंमलदार अमोल घावटे, उत्तरेश्वर धस, पुनम राणे,
हनुमंत कांबळे, दिनेश जाधव यांच्या पथकाने केली.

पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी पुणे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देवून शरीराविरुद्ध व
मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणारे व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांवर मोक्का,
तडीपार यासारख्या कारवाया केल्या आहेत. यापुढेही अशा प्रकारच्या कारवाया केल्या जणार आहेत.
पोलीस आयुक्तांनी आज पर्यंत पुणे शहरातील 57 गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कारवाई केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Radhakrishna Vikhe Patil | धनगर आरक्षणावरुन राधाकृष्ण विखे पाटलांवर टाकला भंडारा, प्रतिक्रिया देताना विखे पाटील म्हणाले… (व्हिडिओ)

हिंजवडी आयटी पार्कमध्ये मेफेड्रॉन, अफू विकणारे दोन राजस्थानी गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई

Wagle Ki Duniya | सोनी सबवरील वागले की दुनिया मालिकेतील परिवा प्रणती ऊर्फ वंदना म्हणाली,
भय आणि लोकलज्जेला मागे टाकून ब्रेस्ट कॅन्सरवर खुलेपणाने चर्चा करणे महत्त्वाचे आहे

Pashmina – The Thread Of Love | सोनी सबवरील पश्मिना मालिकेत निशांत मलकानी साकारणार व्यवहारचतुर दिग्गज उद्योगपती राघवची भूमिका