Pune Police News | पुण्यात सापडलेली हैदराबादमधील अल्पवयीन मुलगी खडकी पोलिसांमुळे पालकांच्या ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police News | सतर्क नागरिक आणि पुणे पोलिसांच्या प्रयत्नांमुळे हैदराबाद (Hyderabad) येथील एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला (Minor Girl) तिच्या घऱच्यांकडे सुखरुप स्वाधिन करण्यात आले. ही मुलगी खडकी येथे बुधवारी (दि.8) रस्त्यावर फिरताना दोन नागरिकांना आढळून आली होती. त्यांनी मुलीला पोलिसांच्या स्वाधिन केले. यानंतर पोलिसांनी (Pune Police News) तिच्या घरच्यांची माहिती मिळवून तिला गुरुवारी (दि.9) पालकांच्या स्वाधीन केले.

 

खडकी पोलीस ठाण्यातील (Khadki Police Station) तपास पथकाचे पोलीस अधिकारी बुधवारी सायंकाळी सहा ते आठ यावेळेत पेट्रोलींग करत होते. त्यावेळी संग्रामसिंग व विनोदसिंग यांनी रस्त्यावर फिरणाऱ्या एका मुलीला तपास पथकाच्या स्वाधिन केले. तसेच ही मुलगी एकटी रस्त्यावर फिरत असल्याची माहिती पोलिसांना (Pune Police News) दिली.

 

पोलिसांनी मुलीला पोलीस ठाण्यात आणून तिला विश्वासात घेत तिचे नाव विचारले असता समारा अवस्थी सोंगाला Samara Awasthi Songala (वय-13 रा. कंपोली तेलंगणा) असे सांगितले. त्यानंतर तिच्या पालकांची माहिती घेऊन खडकी पोलिसांनी तेलंगणा पोलीस नियंत्रण कक्ष (Telangana Police Control Room) येथे संपर्क साधला. मुलीने सांगितलेल्या पत्त्यावरुन ती तेलंगणा येथील पेठ नशिराबाद पोलीस ठाण्याच्या (Peth Nasirabad Police Station) हद्दीत राहणारी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पेठ नशिराबाद पोलीस ठाण्यात संपर्क करुन मुलीबाबत चौकशी केली. त्यावेळी पोलीस ठाण्यात आयपीसी 363 नुसार 5 फेब्रुवारी रोजी गुन्हा (FIR) दाखल असल्याची माहिती तेलंगणा पोलिसांनी दिली.

दरम्यान, मुलीला येरवडा येथील बालकल्याण संस्थेत (Child Welfare Institute Yerwada) ठेवण्यात आले.
गुरुवारी मुलीचा सख्खा भाऊ सोगाला सुहास आर्य़न गुप्ता व
पेठ नशिराबाद पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार ए.डी. हर्षदा पाशा हे खडकी पोलीस ठाण्यात आले.
कायदेशीर कारवाई पूर्ण केल्यानंतर मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

 

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Retesh Kumaarr), पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा (Addl CP Ranjan Kumar Sharma),
पोलीस उपायुक्त परिमंडळ -4 शशिकांत बोराटे (DCP Shashikant Borate),
सहायक पोलीस आयुक्त आरती बनसोडे (ACP Aarti Bansode), वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु ताम्हाणे (Senior Police Inspector Vishnu Tamhane)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शारदा वालकोळी (API Sharda Valkoli),
पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, पोलीस अंमलदार सुपे, जगताप, अहिवळे यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Police News | A minor girl from Hyderabad who was found in Pune is in the custody of her parents due to Khadki police

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | लोणीकंद पोलिसांची हातभट्टी दारु बनविणाऱ्या भट्टीवर कारवाई, दारु बनवण्याचे 3 हजार लिटर कच्चे रसायन केले नष्ट

Parbhani Crime News | घरात बहिणीच्या लग्नाची तयारी सुरु असताना चुलत भावाची आत्महत्या

Pune Chinchwad Bypoll Election | चिंचवड पोटनिवडणूक : चिंचवडमध्ये तिरंगी लढत, पोटनिवडणूक लढवण्यावर राहुल कलाटे ठाम