Pune Police News | पुण्यातील बिल्डरविरूध्द गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ ! पोलिस निरीक्षकासह उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Pune Police News | फ्लॅट खरेदी फसवणूक (Cheating Case) प्रकरणात बिल्डरविरूध्द (Builder In Pune) गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याच्या आरोपावरून सहकारनगर पोलिस स्टेशनचे (Sahakar Nagar Police Station) तत्कालीन पोलिस निरीक्षक (Police Inspector) आणि पोलिस उपनिरीक्षकाची (Police Sub Inspector) चौकशी करण्याची शिफारस विभागीय पोलिस प्राधिकरणाने (Divisional Police Authority) राज्य शासनाकडे (Maharashtra Govt) केली आहे. याबाबतचे आदेश प्राधिकरणाचे अध्यक्ष आर.व्ही. जटाले (R.V. Jatale) आणि सदस्य बी.जी. गायकर (B.G. Gaikar) यांनी दिले आहेत. (Pune Police News)

याबाबत अधिक माहिती अशी की, शोभना मोहन डेंगळे (रा. गणेश प्रसाद बिल्डींग, पुण्याईनगर, धनकवडी, पुणे) यांनी सहकारनगर पोलिस स्टेशनेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे (PI Anil Shewale) आणि पोलिस उपनिरीक्षक बापू खेंगरे (PSI Bapu Khengre) यांच्याविरूध्द विभागीय पोलिस प्राधिकरणात तक्रार दिली होती. शोभना डेंगळेंनी बी.डी. कन्स्ट्रक्शनकडून (B D Construction Pune) बांधण्यात येणार्‍या इमारतीतील तिसर्‍या मजल्यावर फ्लॅट खरेदी केला होता. बिल्डरने तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅट न देता त्यांना 5 व्या मजल्यावरील फ्लॅट दिला होता. त्यामुळे डेंगळेंनी बिल्डरविरूध्द दि. 31 ऑगस्ट 2019 रोजी तक्रार दिली होती. त्यांनी पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे आणि पोलिस उपनिरीक्षक बापू खेंगरे यांची भेट घेतली होती. पण, याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. त्याबाबत दाद मागण्यासाठी डेंगळेंनी विभागीय पोलिस प्राधिकरणात तक्रार दिली. (Pune Police News)

विभागीय पोलिस प्राधिकरणाने दोन्ही बाजु ऐकून घेतल्या आणि याबाबतची चौकशी करण्याबाबत राज्य शासनाला कळविले आहे. संबंधित आदेशाची प्रत गृह विभागाच्या अतिरिक्त सचिव (ACS Home Maharashtra) आणि पुणे पोलिस आयुक्तांना (Pune CP) देण्यात यावे असे प्राधिकरणाच्या आदेशात म्हंटले आहे.

Web Title :   Pune Police News | Avoid filing a case against the builder in Pune! Order of inquiry of PSI Bapu Khengre with PI Anil Shewale Of Sahakar Nagar Police Station

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | नारायणगाव पोलिस स्टेशन – एकाच तरुणीच अनेकांशी विवाह लावून लाखो रुपयांना लुबाडले

Maharashtra Talathi Bharati 2023 | सुशिक्षीत बेरोजगारांसाठी खुशखबर ! राज्यात तलाठी पदासाठी 4 हजार 625 जागांची मेगाभरती, शासनाकडून आदेश जारी

Maharashtra IAS Officer Transfer | राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्या, वाचा संपुर्ण यादी

Pune Crime News | 10 टक्के व्याजाने घेतलेले पैसे परत केल्यानंतर देखील पैशासाठी तगादा लावणार्‍या सूरज म्हेत्रेविरूध्द खंडणीचा गुन्हा