Pune Police News | पोलिस अन् कस्टम विभागात नोकरीच्या आमिषाने 51 लाखांची फसवणूक; ‘वर्दी’ घालून गंडविणार्‍याला फरासखाना पोलिसांकडून अटक

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पोलीस दलात (Police Department) आणि कस्टममध्ये (custom) नोकरी (Job) लावून देतो असे सांगत लाखो रुपये उकळणाऱ्या बोगस पोलिसाला (Fake Police / Bogus Police) पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. त्याने पुण्यातील तिघांकडून तबल 51 लाख रुपये उकळले आहेत. त्याच्या गाडीत पोलिसांच्या गणवेशाचा साठाच सापडला असल्याची माहिती पुणे पोलिसांनी (Pune Police) दिली आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

राजेंद्र रामचंद्र शिंदे (वय 43, रा. काळेपडळ) Rajendra Ramchandra Shinde असे अटक केलेल्याचे नाव आहे. तर सुलोचना दादू सोनवणे (वय 37) Sulochana Dadu Sonawane हिच्यावर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. याबाबत दीपक मोहनलाल मुंदडा (वय 51) Deepak Mohanlal Mundada यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चार वर्षांपूर्वी राजेंद्र शिंदे (Rajendra Shinde) याच्याशी ओळख झाली होती. त्याने फिर्यादी यांच्याकडून गणेशोत्सव काळात गणेश मूर्ती खरेदी केली होती. त्यावेळी त्याने आपण पोलीस असल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्याने फिर्यादी यांचा मोबाईल क्रमांक देखील घेतला होता. अधूनमधून त्यांचे फोनवर बोलणे होत असत. त्यावेळी त्याने मुंबई पोलीस दलात नोकरीस असल्याचे सांगितले होते. यानंतर तो त्यांना भेटण्यास देखील आला.

यावेळी तो पोलीस गणवेशात आला होता. तर त्याच्या गाडीत देखील गणवेश होते. त्याने फिर्यादी यांना माझ्या कस्टम (Custom Department) आणि पोलीस खात्यात (Police Department)ओळखी आहेत. कोणाला नोकरी (Job) करायची असल्यास लावून देतो, असे सांगत त्यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादी यांचा विश्वास बसल्याने त्यांनी होकार दिला. त्याने मुलगा, भाचा आणि पुतण्या यांना कस्टम ऑफिस (pune customs office) येथे नोकरी लावून देतो, असे सांगत फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी 51 लाख 17 हजार रुपये घेतले. मात्र, नोकरी (Job) मात्र लावली नाही.

यादरम्यान तो एकदिवस गणवेशात (uniform) त्यांना भेटण्यास आला. मात्र यावेळी त्यांच्या अंगावर असलेला गणवेश (uniform) हा पोलीस उपनिरीक्षकाचा (Police Sub Inspector) होता. आणि त्याने नेमप्लेट सहाय्यक पोलीस निरीक्षकाची (Assistant police Inspector) लावली असल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. मग त्यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे (Senior Police Inspector of Rajendra Landge) यांना संपर्क साधला आणि माहिती दिली. लागलीच पोलिसांनी त्याला पकडले.

राजेंद्र शिंदे (Rajendra Shinde) हा मूळचा मुंबईचा (Mumbai) आहे.
त्याची दोन लग्न झालेली आहेत.
एक पत्नी या गुन्ह्यात त्याला सहभागी असल्याचे आतापर्यंत केलेल्या तपासात समोर आले आहे,असे सांगण्यात आले आहे.
अधिक तपास फरासखाना पोलीस (Faraskhana Police) करत आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title :  Pune Police News | cheating of Rs 51 lakh Faraskhana police arrest man wearing police uniform

 

हे देखील वाचा

Amrita Fadnavis | लसीकरणाची आकडेवारी देत अमृता फडणवीसांचे ट्विट, म्हणाल्या – ‘हो, मी भक्त अन् त्याचा मला अभिमान’

विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणार्‍याला डॉक्टरांनी वाचविले ‘प्राण’; पण त्याने खिडकीतून उडी घेऊन केली ‘आत्महत्या’

अभिनेता उज्वल धनगरचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; मराठी कलाविश्वावर शोककळा