Pune Police News | मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक जागेवर नसल्याने सावळा गोंधळ? एसीपी व्हिजीटला देखील उनुपस्थिती, पुणे पोलिस दलात चर्चेला उधाण

पुणे (नितीन पाटील) :

 

Pune Police News | मुंढवा पोलिस स्टेशनमधील (Mundhwa Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षकास (Sr. PI Mundhwa) पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी गेल्या आठवड्यात चांगलेच फैलावर घेतले होते. त्या दिवशीपासून आजपर्यंत वरिष्ठ पोलिस निरीक्षक केवळ हजेरी घेण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये ‘हजेरी’ लावतात आणि ‘गायब’ होत असल्यामुळे मुंढवा पोलिस ठाण्यासह संपुर्ण पुणे पोलिस दलात चर्चेला उधाण आले आहे. एवढेच नव्हे तर नवनियुक्ती एसीपी (ACP Hadaspar Division) यांनी सोमवारी पोलिस स्टेशनला भेट दिली. त्यावेळी देखील वरिष्ठ पोलिस निरीक्षक हजर नसल्याने वेगवेगळे तर्क-विर्तक काढले जात आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा मोबाईल फोन देखील गेल्या 6-7 दिवसांपासुन कायम (बहुतांश वेळ) स्वीच ऑफ येत असल्यामुळे या प्रकरणाची चर्चा सध्या पुणे पोलिस दलात सुरू आहे. (Pune Police News)

 

गेल्या काही दिवसांपासुन मुंढवा पोलिस स्टेशन वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे. त्यामध्येच एका गंभीर प्रकरणाची माहिती पोलिस आयुक्तांना मिळाली. त्यानंतर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मुंढव्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकास आयुक्तालयात पाचारण केले होते. आयुक्तांसमोर जाताच वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची बोलती बंद झाली. दरम्यान, पोलिस आयुक्तांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची चांगलीच खरडपट्टी काढली आणि फैलावर घेतले अशी चर्चा सध्या पुणे पोलिस दलामध्ये आहे. साधारण गेल्या मंगळवापासून मुंढवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक केवळ सकाळी आणि रात्री पोलिसांची हजेरी घेण्यासाठी पोलिस ठाण्यात ‘हजर’ असतात. त्यानंतर ते ‘गायब’ होत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, पोलिस स्टेशनच्या क्रमांकावर संपर्क साधला असता फोनवरील संबंधित महिला कर्मचार्‍याने ‘साहेब नाहीत, आम्ही पण त्यांचा फोन लावतो आहोत पण लागत नाही’ असे उत्तर सोमवारी दिले होते.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक जागेवर नसल्यामुळे मुंढवा पोलिस स्टेशनमधील गेल्या 5-6 दिवसांचे ‘टपाल’ देखील पेडिंग असल्याची माहिती समोर येत आहे. नेमकं काय घडलंय याची उत्सुकता मुंढवा पोलिस स्टेशनमधील पोलिसांसह संपुर्ण पुणे पोलिस दलास असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जागेवर नसल्याने पोलिस स्टेशन कोण चालवतंय? याबाबत देखील चर्चा सुरू झाली आहे. काही महत्वाचे आदेश, सूचना आणि निरोप देण्यासाठी वरिष्ठ पोलिस निरीक्षक हे सरकारी वाहनावरील चालकाच्या मोबाईलचा वापर करत असल्याची माहिती समजते.

 

पोलिस आयुक्तांनी मुंढवा पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची कोणत्या प्रकरणावरून खरडपट्टी काढली
हे मात्र अद्यापही गुलदस्त्यातच आहे. आयुक्तांनी एका गंभीर प्रकरणावर वरिष्ठ निरीक्षकास सुनावले
अन् त्याच्या दुसर्‍या दिवशीपासून वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्वसामान्यांसाठी नॉट रिचेबल झाले आहेत.
दोन दिवसांपुर्वी शहरात बदलून आलेल्या 3 सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
हडपसर विभागाच्या सहाय्यक आयुक्त अश्विनी राख यांनी सोमवारी मुंढवा पोलिस स्टेशनला भेट दिली.
त्यावेळी देखील मुंढव्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हजर नव्हते.
असे नेमके काय घडले आहे की एसीपींच्या पोलिस स्टेशन भेटीच्यावेळी देखील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनुउपस्थित राहतात.
गेल्या 6-7 दिवसांपासुन मुंढवा पोलिस स्टेशनमध्ये यामुळे सावळा गोंधळ सुरू असल्याचे सध्या तरी चित्र आहे.

 

Web Title :  Pune Police News | There is chaos in Mundhwa police station as the
senior police inspector is not there? Absence of ACP visit also sparks discussion in Pune Police Force

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा