Pune Police | पुणे शहर पोलीस दलातील तिघांना राष्ट्रपती पोलीस पदक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police | देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या (Independence Day) पुर्वसंध्येला केंद्र सरकारकडून (Central Government) ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ Presidential Police Medal जाहीर करण्यात आलं आहे. पुणे पोलीस (Pune Police) दलातील तीन जणांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ मिळालं आहे. पुणे पोलीस (Pune Police) दलातील सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख (ACP Surendranath Deshmukh), सहायक पोलीस उपनिरीक्षक पॉल अँथोनी (ASI Paul Anthony), विजय भोसले (Vijay Bhosale) यांना जाहीर झाले आहे. गुणवत्तापुर्ण सेवेसाठी दोघांना राष्ट्रपती पोलीस पदक देण्यात आले आहे.

सुरेंद्रनाथ देशमुख हे पुणे पोलीस दलात गुन्हे शाखेचे (Crime Branch) सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. देशमुख हे मुळचे नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदुरी-रुम्भोडी गावचे रहिवासी आहेत. आतापर्यंत त्यांनी 36 वर्षे सेवा बजावली असून पावणे चारशे बक्षिसे मिळाली आहेत. देशमुख यांनी आतापर्यंत मुंबई शहर, नवी मुंबई, पुणे ग्रामीण, पुणे शहर, सांगली, औरंगाबाद शहर येथे सेवा बजावली आहे.

मुंबईतील कामाठीपुरा (Kamathipura) येथील दंगलीची खबर मिळताच 8 पोलिसांसह घटनास्थळी जाऊन गोळीबार करीत दंगलीवर नियंत्रण मिळवले होते. पोलीस अधिकाऱ्यास मारहाण करुन त्यांची सर्व्हिस रिव्हॉलवर पळवून नेणाऱ्या आरोपीला 12 तासात अटक केली होती. तर येरवडा कारागृहातील (Yerawada Jail) जिंदा व सुखा हे अतिरेकी ठेवलेल्या अंडा सेलमध्ये एकट्याने जाऊन त्यांच्याकडील पिस्तुलाची झडती घेतली होती.

पॉल अँथोनी हे पुणे पोलीस दलातील विशेष शाखेत कार्यरत आहेत अँथोनी हे परकीय नागरीक नोंदणी विभागात पोलीस उपनिरीक्षक या पदावर काम करत आहेत. अँथोनी यांनी आपल्या 34 वर्षाच्या सेवेत 310 बक्षिसे मिळाली आहेत. त्यांनी आतापर्यंत पोलीस मुख्यालय, डेक्कन पोलीस ठाणे, गुन्हे शाखा, निगडी पोलीस ठाणे, मार्केट यार्ड पोलीस ठाणे या ठिकाणी सेवा बजावली आहे.

विजय भोसले हे सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
त्यांनी आतापर्यंत 349 बक्षिसे मिळाली आहेत. पोलीस महासंचालक सन्मानचिन्हही प्राप्त झाले आहे.
त्यांनी गुन्हे शाखा, स्वारगेट पोलीस ठाणे, वाहतुक नियंत्रण शाखा, खडक पोलीस ठाणे येथे बजावली आहे.
गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्तांचे मदतनीस म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
हे काम करत असताना गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध मोक्का तसेच गुन्हेगारांना स्थानबद्ध करण्याच्या कारवाईत सहभाग घेतला आहे.

Web Title :-  pune police | presidents police medal awarded to three members of pune city police

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Delivery Scam on WhatsApp | व्हॉट्सअ‍ॅपवर सुरू झालंय डिलिव्हरी ‘स्कॅम’, एक चूक अन् रिकामं होईल बँक अकाऊंट; जाणून घ्या

Police News | चेक पोस्टवर पोलीस कर्मचार्‍याला चिरडून पळाला कार चालक, पाहा धक्कादायक व्हिडीओ

MNGL Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती