Pune Crime | परस्पर फ्लॅट विकून महिलेची 18 लाखाची फसवणूक, ओरिएंट शिवम डेव्हलपर्ससह 5 जणांवर FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फ्लॅटचा व्यवहार करुन एका महिलेकडून 18 लाख रुपये घेऊन तो फ्लॅट दुसऱ्या व्यक्तीला विकल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुण्यातील (Pune Crime) ओरिएंट शिवम डेव्हलपर्ससह (Orient Shivam Developers) 5 जणांवर कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud police station) फसवणुकीचा (Cheating) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 6 मार्च 2018 ते 13 ऑक्टोबर 2021 या कालावधीत कोथरुड येथील ओरिएंट अँड प्रमोटर्सच्या कार्यालयात घडला.

 

याप्रकरणी 50 वर्षीय महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ओरिएंट शिवम डेव्हलपर्स, पार्टनर दिबेन्दु मोईत्रा Partner Dibendu Moitra (रा. गोखलेनगर, पुणे), महेंद्र येवले Mahendra Yewale (वय-53 रा. घोलेरोड, पुणे), शिवम प्रमोटर्स (Shivam Promoters), रमेश जैन Ramesh Jain (रा. अहमदनगर) यांच्यावर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने ओरिएंट अँड प्रमोटर्स यांच्या कोंढवा बु. येवलेवाडी येथील लोटस बिल्डीग मध्ये फ्लॅट खरेदी केला आहे.
फ्लॅटच्या खरेदी व्यवहारापोटी फिर्यादी यांनी आरोपींना 18 लाख रुपये (Pune Crime) दिले.
फिर्यादी यांच्याकडून पैसे घेऊनही आरोपींनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांना खरेदी खत करुन दिले नाही.
तसेच फिर्यादी यांनी घेतलेला फ्लॅट त्यांच्या परस्पर सुनिल महाडिक या व्यक्तील विकून आर्थिक फसवणूक केली. पुढील तपास कोथरुड पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | FIR against 5 including Orient Shivam Developers for cheating Rs 18 lakh by selling flats

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यातील उच्चशिक्षित तरुणीवर सामूहिक बलात्कार, व्हिडिओ क्लिप केली व्हायरल

अवघ्या 21 हजारात 1 वर्षाच्या गॅरंटीसह खरेदी करा Honda Activa, पसंत न आल्यास कंपनी परत देईल पूर्ण पैसे

Mahapour Chashak | महापौर चषक स्पर्धेवर अनिश्चिततेचे सावट, स्पर्धेेच्या मान्यतेस वित्तीय समितीचा नकार