पुण्यात Unlock 1.0 मध्ये राजरोसपणे सुरू असणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, मॅनेजर अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –   शहरात कडकडीत अवैध प्रकार बंद असताना बाणेर भागात रो-हाऊसमध्ये सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायाचा छापा टाकून पर्दाफाश केला आहे. चार महिलांची सुटका करत मॅनेजरला अटक केली आहे. सुरेश प्रल्हाद रणवीर (वय २५, रा. बाणेर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चतुःश्रुगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व आस्थापना बंद होत्या. तर दुसरीकडे एकही अवैध प्रकार सुरू नसल्याचे सांगितले जाते. मात्र बाणेरमधील धनकुडे वस्तीलगत पाषाण टेकडीजवळ एका रो-हाऊसमध्ये महिलांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या माहितीची खातरजमा केली. तसेच सापळा लावून छापा टाकला. त्यावेळी येथे चार पीडित महिलाकडून जादा पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायास करून घेतला जात असल्याचे समोर आले. या पीडित महिलांची सुटका करीत सुरेशला अटक केली. चौकशीत त्याने महिलांना जादा पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याची कबुली दिली.

पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, वरिष्ठ निरीक्षक अनिल शेवाळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे, कर्मचारी सतीश चव्हाण, अरुण साबळे, सतीश पंडीत, रुपाली भरेकर, स्मिता महाजन, अजय येवरीकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.