Pune Police Recruitment Exam | पुणे पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेकडे उमेदवारांची पाठ ! जेमतेम 31.28 टक्केच उमेदवारांची हजेरी; 3 ‘डमी’ उमेदवार जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Police Recruitment Exam | पुणे आयुक्तालयातील पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेकडे (Pune Police Recruitment Exam) मोठ्यासंख्येने उमेदवारांनी पाठ फिरविली. भरतीसाठी अर्ज केलेले जेमेतेम ३१. २८ टक्केच उमेदवारच परीक्षेसाठी हजर राहीले. तर पोलिसांनी परीक्षेवेळी ठेवलेल्या बंदोबस्तामुळे तीन केंद्रांवर तीन डमी उमेदवारही आढळले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ. जालिंदर सुपेकर (Addl CP Jalinder Supekar) यांनी दिली.

पुणे पोलिस आयुक्तालयातील शिपाई पदाच्या भरतीसाठी आज ७९ केंद्रांवर लेखी परीक्षा घेण्यात आली. पोलिस भरतीसाठी ३८ हजार ४४१ उमेदवारांनी अर्ज केले होते.
मात्र, प्रत्यक्षात लेखी परीक्षेला १२ हजार २७ उमेदवारांनीच हजेरी लावली (Pune Police Recruitment Exam). उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोहोचता यावे
यासाठी रेल्वे स्टेशन व बस स्थानकांमध्येही मार्गदर्शनासाठी पोलिस तैनात करण्यात आले होते.
तसेच परीक्षा केंद्रांवर उमेदवारांसाठी पाणी व फळेही पोहोचवण्याची जबाबदारी पोलिसांनी उचलली.
सर्वच परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा बसविण्यात आली होती.
तसेच परीक्षा केंद्रांवर व्यापक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

 

दरम्यान, परीक्षेदरम्यान भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या (bharti vidyapeeth police station) हद्दीतील सिंहगड कॉलेज ऑफ सायन्स
(sinhgad college of science) या केंद्रावर बाबासाहेब भिमराव गवळी (वय २२, रा. सांजखेडा, औरंगाबाद) हा तोतया उमेदवार योगेश कौतिकराव गवळी
या उमेदवाराऐवजी परीक्षेस बसल्याचे निदर्शनास आले.
तसेच महेश सुधाकर दांडगे (रा. जाफराबाद, जालना) या उमेदवाराने जनक सिसोदे या मध्यस्थामार्फत पाच लाख रुपये देतो
असे आश्‍वासन देउन विठ्ठल किसन जारवाल याला स्वत:ची ओळखपत्र देउन परीक्षा देण्यास पाठविल्याचे निदर्शनास आले.
आणखी एका प्रकरणामध्ये शामराव भोंडणे याने रामेश्‍वर गवळी या डमी उमेदवाराला परीक्षेसाठी बसविल्याचे उघडकीस आले.
या तीनही प्रकरणात संबधितांवर अनुक्रमे भारती विद्यापीठ आणि सिंहगड रोड पोलिस ठाण्यात (Sinhagad Road Police Station)
गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती डॉ. सुपेकर यांनी दिली.

 

Web Title : Pune Police Recruitment Exam | Less candidates for the written examination of Pune Police Recruitment , Only 31.28 per cent candidates appeared for the exam, Dummy candidates in three places in police trap – Addl CP Jalinder Supekar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune NCP | पुण्यात पोलिस भरतीच्या परिक्षेसाठी आलेल्या उमेदवारांना राष्ट्रवादीने दिला ‘निवारा’

Pune News | निळूभाऊ फुले, शंकरराव खरात यांच्या नावाने पुरस्कार सुरू करा

FSSAI Recruitment 2021 | भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणमध्ये 255 जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया