Pune Police Suspended | वाहतूक शाखेतील ‘त्या’ सहायक फौजदाराचे तडकाफडकी निलंबन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Police Suspended | वाहतूक शाखेत कार्यरत (Pune Traffic Branch) असणाऱ्या एका सहायक फौजदाराने मद्यधुंद (Drunk) असताना वाहन चालकांना शिवीगाळ करुन दंडाच्या नावाखाली पैशाची मागणी (Demanding Money) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर (DCP Vijayakumar Magar) यांनी सहायक फौजदाराला निलंबित (Pune Police Suspended) केले आहे. प्रेमचंद भानुदास वेदपाठक (Premchand Bhanudas Vedapathak) असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसाचे नाव आहे.

प्रेमचंद वेदपाठक शिवाजीनगर वाहतूक शाखेत (Shivaji Nagar Traffic Branch) सहायक फौजदार (Pune Traffic Police) आहेत. मॉडेल कॉलनी परिसरात वाहतूक नियमन करत होते. कर्तव्यावर असताना वेदपाठक यांनी मद्यापान केले होते. त्यांनी वाहन चालकांना अडवडून दंडाच्या नावाखाली पैशांची मागणी केली होती. नागरिकांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केले.

यासंदर्भात एका महिलेने शिवाजीनगर वाहतूक विभागाकडे
लेखी तक्रार केली होती. महिलेच्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन
वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी
प्रेमचंद वेदपाठक यांना निलंबित (Pune Police Suspended)
करण्याचे आदेश दिले. वेदपाठक यांनी पोलीस खात्याची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवून त्यांना निलंबित केले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Allu Arjun | अल्लू अर्जुनने केला पुष्पा 2 चित्रपटाचा डायलॉग रिव्हिल; 
 यावेळी पुष्पा फ्लॉवर नाहीतर आहे…

Pune Crime News | पतीच्या व्यवसायातील अपयशामुळे होणार्‍या छळाला
कंटाळून विवाहितेची आत्महत्या; लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल