पुणे पोलिसांना पाहिजेत पुणेरी पाट्या असतील तर ‘येथे’ पाठवा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्याला सांस्कृतीक शहर म्हणून ओळखले जाते तसे पुणेरी पाट्यामुळे देखील पुण्याची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कमीत कमी शब्दात संदेश समोरच्यापर्यंत पोहचवण्याची पुणेकरांची ही पद्धत जगभरात प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळेच पुणे पोलिसांनी वाहतूक विषयक पुणेरी पाट्या पाठवण्याचे आवाहन पुणेकरांना केले आहे. यापूर्वी फक्त आयुक्तालयाच या पाट्या लावण्यात आल्या होत्या. मात्र आता चौकी बाहेर देखील अशा पाट्या लावण्यात येणार आहेत. जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्या वाचता येतील. पुणे पोलिसांनी ‘पुणेरी पोलीस पाट्या’ या संकल्पनेवर आधारीत हा उपक्रम सुरु केला आहे.

पुण्यातील पेठांमध्ये आजही पुणेरी पाट्या पहायला मिळतात. या पाट्यांमधून समोरच्याचा पुणेरी शैलीतून अपमान करण्याची खास पद्धत फक्त पुण्यातच पहायला मिळते. विनोद, राग, सुचना अशा या पाट्या आपल्याला पेठांमध्ये वाचायला मिळतात. मात्र आता याच पाट्या पोलीस ठाण्यात आणि चौकीत पहायला मिळणार आहेत. या पाट्या अपमान करणाऱ्या नाहीत तर पुणे पद्धतीने नियम सांगणाऱ्या पाट्या असणार आहेत.

पुणे पोलिसांनी पुणे पाट्यांचा आधार घेत समाजात प्रबोधन करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे पोलिसांनी खास पुणेरी पाट्या मागवल्या आहेत. ट्विटरच्या माध्यमातून या पाट्या पाठवाव्यात असे आवाहन पुणे पोलिसांनी पुणेकरांना केले आहे. तसेच पुणेरी पाट्यांचा मजकूर ८९७५२८३१०० या व्हाट्सअप क्रमांकावर पाठवता येईल.

काही ‘पुणेरी पोलीस पाट्या’ जीवनावर कंट्रोल नाही, वेगावर नियंत्रण नाही, भरधाव वेगाने जातात म्हणून पोलिसांनी पकडल तर म्हणतात आत्ता वेळ नाही.

क्षणभरा करीता का होईना पोलिसांच्या भूमिकेत येऊन पहा, म्हणजे लक्षात येईल की इच्छा मारणे म्हणे नक्की काय असते, ते..!
आनंदात व सुखात बरीच माणसं असतात परंतु तुमच्या दु:खात व संकटकाळात फक्त पोलीस नावाचा माणुस असतो.
१०० नंबर फुकट आहे म्हणून कोणत्याही कारणासाठी डायल करू नका नको बंड, नको दंड हेल्मेट घालुन, डोके ठेवू थंड

अकाली केस ‘पांढरे’ का होतात ? जाणून घ्या कारणे

कष्टाची कामे न करणाऱ्यांनी ‘लठ्ठपणा’ असा कमी करावा

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘स्पर्म काऊंट’ वाढवण्यासाठी मध आणि आवळा ‘रामबाण’ उपाय ; ‘असे’ करा सेवन !

जेवणानंतर ‘या’ गोष्टींचे सेवन कटाक्षाने टाळा ; अन्यथा …

अ‍ॅसिडीटीला मुळापासून संपवा, करा ‘हा’ नैसर्गिक उपाय