Pune Politics | ‘दादा… पुणेकरांना वाचवा’; काँग्रेस नेत्याकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना पत्र (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Politics | कसबा पोटनिवडणुकीच्या (Pune Kasba Peth Bypoll Election) प्रचारादरम्यान चंद्रकांत पाटील यांनी ‘हू इज धंगेकर’ (Who is Dhangekar?) असे म्हटले होते. यावरुन आता काँग्रेस (Congress) नेते, कार्यकर्ते आणि चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. यातच आता पुण्यातील (Pune Politics) काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संजय बालगुडे (Sanjay Balgude) यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलेल्या पत्राची चर्चा रंगू लागली आहे. दादा… पुणेकरांना वाचवा असं या पत्रात लिहिलं आहे. आता यावर चंद्रकांत पाटील कशा प्रकारे प्रत्युत्तर देतात हे पहावे लागले.

काय लिहिलंय पत्रात?

पुण्यातील नागरिकांना 1970 सालापासून स्वत:च्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये 40 टक्के सवलत मिळत होती. 2011 मध्ये महालेखा परिक्षकांनी यासंदर्भात आक्षेप नोंदवला होता. पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) गेल्या तीस वर्षांपासून असलेल्या अनेक निर्णयांबाबतही आक्षेप नोंदवला होता. याचाच आधार घेऊन 2018 मध्ये तुमचे सरकार असताना व तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे नगर विकास खाते असताना एक अध्यादेश काढण्यात आला. (Pune Politics)

या अध्यादेशानुसार 1900 सालापासून पुणेकरांना मिळणारी घरपट्टीतील सवलत रद्द करण्यात आली आहे. केवळ सवलतच रद्द केली नाही तर 1300 सालापासून सन 2018 पर्यंत मिळालेली सवलत व्याजासहित पुणेकरांकडून वसूल करा असा स्पष्ट आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आपण वारंवार आश्वासन देऊन ही आता पुणेकरांना नोटीस येऊ लागल्या आहेत. 40 टक्के सवलत पुणेकरांना मिळाली पाहिजे. चंद्रकांत दादा आपण पालकमंत्री असून आपण पुणेकरांना वाचवा, असे पत्रात म्हटलं आहे.

पुणेकर घरपट्टीच्या ओझ्या खाली दबून गेला

पुणे महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता असताना वसूली व व्याज घेण्यावर स्थगिती द्यावी असा ठराव करुन सरकारकडे पाठवला होता. याबाबत आपण पुन्हा मंत्री झाल्यावर आपल्याला याबाबत विचारले असता, या वसूलीलाच अध्यादेशाला स्थगिती देऊन पुणेकरांना दिलासा देऊ असे जाहीर सांगितले होते. मात्र अद्याप याबाबत शुद्धी पत्रक शासनाने पाठवले नसल्याचे मनपा आयुक्तांनी कळवले आहे. सध्या पुणेकर नागरिकांना सन 2018 पासून 40 टक्के सवलत रद्द करुन थकीत रक्कम व्याजासहित भरावी अशी नोटीस व संदेश पुणेकरांना मोबाईलवर येत आहेत. सामान्य पुणेकर हा घरपट्टीच्या ओझ्या खाली दबून गेला आहे. त्यामुळे आपण आता लक्ष देऊन पुणेकरांना वाचवलं पाहिजे, असंही संजय बालगुडे यांनी म्हटलं आहे.

Web Title : Pune Politics | congress state general secretary sanjay balgude write letter to guardian minister chandrakant patil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | ‘काही लोक 365 दिवस शिमगा करतात, मला त्यांना एवढंच सांगायचंय…’, देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला (व्हिडिओ)

Maharashtra Unseasonal Rain | अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Pune Pimpri Chinchwad Crime | प्रेयसीबद्दल अपशब्द उच्चारल्याच्या रागातून मुलाने केला वडिलांचा खून, दिघीतील घटना; दोन सख्ख्या भावांना अटक