Pune Politics News | पुणे भाजपमध्ये मतभेद?, माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी केला कामाला विरोध

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Politics News | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) प्रशासनाकडून पुणे शहरात अनेक विकास कामे केली जात आहेत. मात्र एका रस्त्याच्या कामावरुन भाजप (BJP) आमदार यांनी आक्षेप घेतल्याने (Pune Politics News) भाजपमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे. बालभारती (Balbharti) ते पौड फाटा या रस्त्याच्या (Poud Phata Road) कामाला भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी (Former MLA Medha Kulkarni) यांनी विरोध केला आहे. तसेच पालिका आयुक्त विक्रम कुमार (PMC Commissioner Vikram Kumar) यांची भेट घेऊन आक्षेप नोंदवला आहे.
बालभारती ते पौड फाटा दरम्यानचा रस्ता शहराच्या विकास आराखड्यात आहे. हा रस्ता तयार करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून (Pune Politics News) गती देण्यात आली आहे. मात्र या रस्त्याला पर्यावरण प्रेमींकडून (Environmentalists) विरोध केला जात आहे. तर पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांची मतं जाणून घेऊन प्रशासनाने या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. परंतु या रस्त्यावरुन पुणे भाजपमध्ये (Pune BJP) मतभेद असल्याचे सोमवारी समोर आले आहे.
आमदार सिद्धार्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole), माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Former Mayor Muralidhar Mohol) आणि पालिकेचे अधिकारी, नागरीक, पर्यावरण प्रेमी यांनी रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली होती. तसेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी देखील पर्यावरम प्रेमींच्या सूचनांचा विचार केला जावा. आणखी सूचना असतील तर त्या पालिका प्रशासनासमोर मांडव्यात. यासंदर्भात सामंजस्याने निर्णय झाला पाहिजे. तसेच शहराची लोकसंख्या वाढत असल्याने गरजा देखील वाढत आहेत. त्यापार्श्वभूमीवर पर्यावरणाचा विचार करुन आवश्यक ते उपाय शोधले पाहिजेत अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
बालभारती ते पौड फाटा या रस्त्याच्या कामासंदर्भात कोथरुडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी
यांनी सोमवारी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मेधा कुलकर्णी म्हणाल्या,
पूर्वी हा रस्ता करण्यासाठी मी आग्रही होते.
मात्र, आता परिस्थिती बदलली असून आपण शहरात मेट्रो (Pune Metro) सारखी सार्वजनिक वाहतुक व्यवस्था उभी करत आहोत.
त्याचवेळी या रस्त्याच्या कामाला का प्राधान्य दिले जात आहे? हा रस्ता कसा होणार? किती खर्च केले जाणार आहेत,
या बाबत प्रशासनाकडून कोणतेही समाधान कारक उत्तर दिले गेले नसल्याचे त्यांनी सांगितले.
Web Title :- Pune Politics News | Disagreement in Pune BJP? Former MLA Medha Kulkarni opposed the work
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Chandrashekhar Bawankule | अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर बावनकुळेंचे सूचक वक्तव्य, म्हणाले…