Pune Politics News | ‘रिक्षावाला’ विधानावरुन पुण्यात शिवसेना आक्रमक, अरविंद सावंतांच्या फोटोला मारले जोडे (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Politics News | ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सरकार स्थापनेवेळी शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का असा सवाल विचारल्याचा मोठा गौप्यस्फोट (Pune Politics News) केला होता. त्यांच्या या विधानावरुन शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पुण्यात सावंत यांच्या विरोधात आंदोलन (Pune Shivsena Protest) करुन त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

 

अरविंद सावंत यांनी केलेल्या विधानाचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. पुण्यातील (Pune Politics News) अलका टॉकीज चौकात (Alka Talkies Chowk) शिवसेनेने केलेल्या आंदोलनात सावंत यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले. तसेच सावंत यांचा पुतळाही जाळण्यात आला. अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

 

 

काय म्हणाले अरविंद सावंत?
काँग्रेस (Congress)-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), अशोक चव्हाण (Ashok Chavan), छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), जयंत पाटील (Jayant Patil), अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासारखे दिग्गज नेते आहेत. ते या ‘रिक्षावाल्या’च्या हाताखाली काम करणार का? तरी उद्धव ठाकरेंनी नाव दिलं होतं. नाही, मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेच असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. पण त्यानंतर शरद पवारांनी गळ घातली. तुम्हीच मुख्यमंत्री व्हायला हवं.
कारण तुमच्याशिवाय हे शिवधनुष्य कोण पेलणार? आपण काय रणांगणातून पळणारे नाही ना.
मग उद्धवजींनी शरद पवारांचा शब्द स्वीकारला आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले,
असे अरविंद सावंत (MP Arvind Sawant) यांनी सांगितले होते.

 

Web Title :- Pune Politics News | pune shivsena protest against thackeray group leader mp arvind sawant on his statement

 

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Shambhuraj Desai | ‘बाळासाहेब ठाकरेंना कुटुंबापुरते मर्यादित ठेऊ नका’, शंभूराज देसाईंची उद्धव ठाकरेंवर टीका

Chandrashekhar Bawankule | अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर बावनकुळेंचे सूचक वक्तव्य, म्हणाले…

Uday Samant | चालकाचे नियंत्रण सुटलं अन्…, उद्योगमंत्री उदय सामंत आणि छत्रपती संभाजीराजेंच्या बोटीला अपघात