Pune Ponzi Scheme | गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या पुण्यातील कंपनीवर ईडीची कारवाई, 24 कोटींची मालमत्ता जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मल्टी-लेव्हल मार्केटिंग (Multi Level Marketing) योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदरांची 125 कोटींची फसवणूक (Cheating Fraud Case) करणाऱ्या पुण्यातील विनोद खुटेवर (Vinod Khute) कारवाई करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ‘व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीज’ची (VIPS Group Of Companies ) पुण्यातील 24 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीने Enforcement Directorate (ED) ही कारवाई शुक्रवारी (दि.4) केली.

अंमलबजावणी संचालनालय (ईडी), मुंबई यांनी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए), 2002 च्या तरतुदींनुसार 24 कोटी 41 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये 21 कोटी 27 लाखांची विविध बँकांमधील 58 खात्यांमधील शिल्लक रक्कम आणि 3 कोटी 14 लाख रुपयांच्या ठेवींचा समावेश आहे. यापूर्वी 62 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. यामध्ये मुख्य आरोपी विनोद खुटे याची 38.50 कोटींची मालमत्ता, विविध बँकांमधील 23 कोटींची रक्कम जप्त केली होती. यापूर्वी ‘फेमा’ अंतर्गत 18.58 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. व्हीआयपीईएस ग्रुप ऑफ कंपनी आणि ग्लोबल एफिलेट बिझनेस कंपनीने लोकांची फसवणूक करुन लुबाडलेला पैसा हवाला आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून विदेशात नेल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.

याबाबत ईडीचे असिस्टंट डायरेक्टर रत्नेशकुमार भुवनेश्वरलाल कर्ण (वय-43) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात 9 ऑक्टोबर रोजी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनोद तुकाराम खुटे, संतोष तुकाराम खुटे, मंगेश खुटे, किरण पितांबर अनारसे, अजिंक्य बडधे व त्यांच्या इतर साथीदारांवर आयपीसी 420, 471, 34, 120 ब नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2020 ते ऑक्टोबर 2023 या कालावधीत आंबेगाव येथील सिंहगड कॉलेजजवळ असलेल्या निर्माण विवा सोसायटीमध्ये घडला होता. ईडीने जून महिन्यात पुणे, मुंबई आणि अहमदाबादमध्ये ‘व्हीआयपीएस ग्रुप’ आणि ‘ग्लोबल एफिलिएट बिझनेस’च्या केंद्रांवर छापेमारी केली होती.

आरोपींनी संगनमत व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनी व ग्लोबल अॅफिलेट बजनेस या कंपनीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना प्रतिमाह 2 ते 3 टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवले. आरोपींनी पॉन्जी स्कीम चालवून लोकांकडून कंपनीच्या बँक खात्यात पैसे न घेता इतर बँकेतील बोगस खात्यावर पैसे घेतले. तसेच कमीशन देण्याचे आमिष दाखवून स्किममध्ये इतर लोकांना पैसे गुंतवण्यास सांगून आर्थिक फसवणूक केली.

आरोपी विनोद खुटे याने इतर साथीदारांच्या मदतीने फोरेक्स ट्रेडींगच्या नावाखाली काना कॅपीटल नावाची कंपनी सुरु केली.
या कंपनीमार्फत गुंतवणूक करण्यासाठी झुम/ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम घेतले.
लोकांना फॉरेक्स ट्रेडिंग मध्ये चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक बनावट कंपन्या (शेल) उभारल्या.
या कंपन्यांच्या बोगस बँक खात्यात पैसे भरण्यास सांगून काही दिवसांनी फॉरेक्स ट्रेडींग करायला लावले.
यानंतर काना कॅपीटल ही कंपनी बंद केली.
यातील आलेले पैसे बेकायदेशीरपणे हवालामार्फत परदेशात पाठवण्यात आल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.
आरोपींनी अनेक लोकांची 125 कोटी पेक्षा जास्त रुपयांची फसवणूक केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : तरुणीचा फोटो वापरुन इंन्स्टाग्रामवर तयार केले फेक अकाउंट, मॉर्फ फोटो व्हायरल करुन विनयभंग

Devendra Fadnavis In Indapur | इंदापुरातील कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, म्हणाले ”कृतीतून करून दाखवणार हा…”

Pune PMC Water Supply | पुणे मनपाकडून मोफतच पाणीपुरवठा, पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे प्रशासनाचे आवाहन