पुणे : खासगी डॉक्टर, मार्केटिंग करणारा 9 हजारांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात, प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   जिल्ह्यातील एका खासगी डॉक्टर अन मार्केटिंग करणाऱ्याला पुण्याच्या लाचलचुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) 9 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. सोमटने फाटा परिसरात ही कारवाई रुग्णालयात झाली आहे.

सत्यजित वाढोकर (वय 58) आणि प्रमोद वसंत निकम (वय 45) असे कारवाई झालेल्याचे नाव आहे. डॉक्टर व खासगी व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर सत्यजित यांचे सोमटने फाटा येथे पवना रुग्णालय आहे. तर प्रमोद हा येथे मार्केटिंग ऑफिसर आहे.

दरम्यान यातील तक्रारदार यांच्या नातेवाईकांना सत्यजित यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांना काही आजार होता. त्याचे ऑपरेशन करणे गरजेचे होते.

यादरम्यान त्यांनी हे ऑपरेशन शासनाच्या महात्मा फुले जन-आरोग्य योजनेमार्फत सुरू होते. या योजनेत सर्व उपचार हे मोफत असतात.

मात्र डॉक्टरने सत्यजित याने उपचार करण्यासाठी डॉक्टर व खासगी व्यक्तीने 10 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार आज सापळा कारवाईत तडजोडीअंती 9 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे.